बिडगाव, ता. चोपडा : येथे गुरुवारी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते सामाजिक सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. येथे आमदार लता सोनवणे यांच्या आमदार फंडातून सामाजिक सभामंडप मंजूर करण्यात आले आहेत. याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच विजया देविदास पाटील, उपसरपंच राजू भगवान साळुंके, सदस्य सलीम तडवी, फातमा तडवी, रेवाबाई पावरा, ग्रामविकास अधिकारी सरिता पाडवी, बांधकाम अभियंता सोपान सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, पं.स.चे माजी उपसभापती माणिकचंद महाजन, एम.व्ही. पाटील, अडावदचे पी.आर. माळी, वरगव्हाणचे सरपंच भूषण पाटील, युवासेनेचे दीपक चौधरी, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, पंचकचे उपसरपंच किशोर पाटील, प्रवीण सोनवणे, किशोर महाजन देवगाव, गोकुळ कोळी, विजय चौधरी उपस्थित होते.