नगर परिषद हद्दीतील फिश मार्केट व पार्किंग व्यवस्था करणे, शाहू महाराज शॉपिंग सेंटरमध्ये तळमजल्यात वाढीव गाळे बांधणे व पहिला मजला बांधकाम करणे व प्रवेशद्वार करण्याच्या कामांचे भूमिपूजन तसेच सुंदरगढीमध्ये सार्वजनिक शौचालय लोकार्पण प्रतीकात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भूमिपूजन नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या हस्ते होणार होते. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, घन:श्याम अग्रवाल आणि संदीप पाटील उपस्थित राहणार होते.
तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून उद्घाटन कार्यक्रमावर बंदीबाबतचा आदेश देण्यात आला आहे. म्हणून नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. मात्र या कामांचा शुभारंभ दि. १४ मे रोजी होत असून, कामे पूर्णत्वास नेऊन लोकार्पण करून नागरिकांना त्याचा लाभ व्हावा हा चोपडा शहर विकास मंचाचा मानस असल्याचे नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांनी कळविले आहे.