यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहेत. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल व त्या त्यांच्या पदरात कशा पाडून देता येईल यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी ४ कोटींच्या निधीतून शहरातील विविध कामे करण्यात आली.
बडा मोहल्ला भागातील मिश्किन शहा दर्गा ते अशोक मराठे यांच्या पान टपरीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (१२ लाख), पारोळा शहरातील सलीम बादशाह यांचे घरापासून ते जानकीराम शिंपी यांचे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (१२ लाख), पारोळा शहरातील प्रभाग क्रमांक ८मधील मडके मारोती चौकपासून ते गोंधळवाड्यातील मशिदीपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे (१२ लाख), पारोळा शहरातील प्रभाग क्र. ८ मधील जुलूमपुरा भागातील साईबाबा मंदिरजवळील गोलाकार रस्त्याचे गटारीसह सिमेंट काँक्रिटीकरण करणे (१२ लाख), पारोळा शहरातील प्रभाग क्र. ८ मधील जुलूमपुरा भागातील पुरुष व स्त्रियांच्या सार्वजनिक शौचालयापासून ते बस स्टँण्डकडे जाणाऱ्या गटाराचे भूमिगत पद्धतीने बांधकाम करणे (१० लाख), मडक्या मारोती चौक ते मोठा महादेव चौकपर्यंत रस्ता खोदकाम करून काँक्रिटीकरण करणे (१५ लाख).
पारोळा शहरातील मडक्या मारोती चौक ते पीर दरवाजापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे (१५ लाख).
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, बाजार समितीचे संचालक चतुर भाऊसाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, उपशहरप्रमुख भूषण भोई, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, जिजाबराव पाटील, डाॅ. पी. के. पाटील, शेतकी संघाचे संचालक राजेंद्र पाटील, सुधाकर पाटील, रमेश महाजन, चेतन पाटील, नगरसेवक मंगेश तांबे, निंबा चौधरी, प्रकाश महाजन, सिध्दार्थ जावळे, पंकज मराठे, राजू पाटील, छोटू चौधरी, पी.आर. वाणी, संजय गोसावी, लखन वाणी, कल्पेश मराठे, मयूर मराठे, पी.आर. पाटील उपस्थित होते.