आपले आई वडील मृत झाले, म्हणून आपल्या मावसभावाकडे राहणारी २१ वर्षीय तरुणी २५ रोजी सकाळी १० वाजता मी प्रताप कॉलेजला जाऊन येते, असे सांगून घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळाली नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला ती हरवल्याची तक्रार करण्यात आली. ती तरुणी सानेनगर भागातील एका तरुणासोबत पळाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर याना तपासाच्या सूचना देण्यात आल्या. हे प्रेमीयुगुल गुजरातकडे जाण्याच्या मार्गावर असताना हटकर यांनी आपले कौशल्य वापरून त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले. मात्र अवघ्या बारा तासात त्या दोघांनी विवाह केल्याचे स्पष्ट झाले. तरुणीने मुलांसोबत जाण्याची तयारी दर्शवल्याने तिला तिच्या सासरी जाऊ देण्यात आले.
सकाळी प्रियकराबरोबर भुर्रर्रर्र, संध्याकाळी लग्न करून सासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:20 AM