भुसावळ, जि.जळगाव : चौकशी अहवाल अनुकूल द्यावा यासाठी एक हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख हरीश मुरलीधर भोई (वय ३०, रा शिरपूर, जि.धुळे, ह.मु.भुसावळ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. भुसावळ आगारात २९ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.आगारातीलच ४९ वर्षीय कर्मचाºयाचा चौकशी अहवाल अनुकूल पाठवावा यासाठी एक हजार रुपयांची लाच हरीश भोई यांनी मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून थेट आगारातच लाच स्वीकारताना पकडले. या कारवाईमुळे एस.टी. विभागांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.दरम्यान, आगारप्रमुख भोई यांना नोकरीस लागण्यास अवघे दोन वर्ष होत आहेत. तत्पूर्वीच भोई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपाधीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी.एम. लोधी, पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहायक फौजदार रवींद्र माळी, पो.ना.मनोज जोशी, सुनील पाटील, जनार्दन चौधरी, पो.कॉं.प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींनी केली.२९ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केल्यानंतर ३० रोजी पहाटे चार वाजून २३ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपी भोई यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती सु. प्र. डोरले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने एका महिला कर्मचाºयालाही दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इतर कुणाला अजून पैशांची मागणी केली आहे. याचा तपास करायचा असून साक्षीदारही तपासायचे आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे पोलीस निरीक्षक लोधी, सरकारी वकील अॅड. संजय सोनवणे यांनी केला व चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली, तर आरोपीतर्फे जळगाव येथील आर.के. पाटील यांनी युक्तीवाद केला. भोई यास ३ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.अवघे दोन वर्ष झाले होते नोकरीस लागण्यासदरम्यान, हरीश भाई हे एसटी महामंडळात आगारप्रमुख म्हणून भुसावळ येथे २६ मे २०१७ रोजी नोकरी लागले होते. भुसावळ येथे त्यांनी पहिला पदभार स्वीकारला होता. २६ मे रोजी त्यांच्या नोकरीस दोन वर्षे पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच ते लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. भोई हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आहे.एसटीतील आगारप्रमुखाची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यावर भोई याची पहिलीच नियुक्ती भुसावळात झाली होती.
भुसावळ आगारप्रमुखास एक हजारांची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 7:01 PM
चौकशी अहवाल अनुकूल द्यावा यासाठी एक हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख हरीश मुरलीधर भोई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
ठळक मुद्देजळगावच्या लाचलुचपत विभागाने भुसावळात रात्री दहाला केली कारवाईअवघ्या दोन वर्षातच ‘भोई’ अडकले ‘जाळ्यात’एसटीतील आगारप्रमुखाची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यावर पहिलीच होती भुसावळातील नियुक्तीचार दिवस पोलीस कोठडीमहिला कर्मचाऱ्यालाही दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार