ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.5 -नाशिक महसूल विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग श्रेणीतील नगरपालिका असलेले भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले आहे. त्या आशयाचा ई-मेल संदेश बुधवारी 5 जुलै रोजी दुपारी 12 वा पालिका कार्यालयास प्राप्त झाल्याची माहीती नगराध्यक्ष रमण भोळे आणि मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली.
केंद्रीय समितीकडून पाहणी
गेल्या 29 जून रोजी केंद्रीय समितीच्या पथकाने (क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया) भुसावळ शहरातील नऊ ओडीएफ (हगणदारीमुक्त) ठिकाणांची पाहणी केली होती. केंद्रीय समितीचे आदेश आणि सूचनेनुसार समितीमधील अधिका:यांनी ओडीएफ ठिकाणांची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला होता. संपूर्ण भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले या आशयाचा ई-मेल संदेश दिल्ली येथील केंद्रीय समितीकडून बुधवारी पालिका प्रशासनाला आला.
विकासाचा पहिला टप्पा
गेल्या अनेक वर्षापासून भुसावळ शहराची अस्वच्छतेबाबत जी दुर्दशा झाली होती, ती आता या केंद्रीय समितीच्या निर्णयाने संपली आहे. आम्ही आता जी कामे व वाटचाल सुरू केली आहे, त्याचा हा निर्णय पहिला टप्पा आहे. भुसावळ शहर हगणदारीमुक्त करण्यामागे पालिका कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी,नगरसेवक यांचा सर्वाचा खारीचा वाटा आहे, मात्र याचे सर्व श्रेय भुसावळ शहरातील रहिवाशांनाच असल्याचे रमण भोळे यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले.
भुसावळ शहर अस्वच्छतेबाबत देशात दुस:या स्थानावर आले होते.त्यामुळे हे शहर आणि पालिका प्रशासनावर अस्वच्छतेबाबत जो एक मोठा डाग लागला होता तो आज भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाल्याने पुसला गेला आहे, अशी भावना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ जवळ बोलताना व्यक्त केली.
नगरपालिका कर्मचारी, अधिकारी आणि शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी,गटनेते हाजी मुन्ना तेली यांनी कर्मचा:यांचे स्वागत केले. प्रमोद नेमाडे, परिक्षीत ब:हाटे, दीपाली ब:हाटे, अॅड.बोधराज चौधरी, पाणी पुरवठा समितीचे सभापती किरण कोलते, रमाकांत महाजन, वसंत पाटील, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, राजेंद्र नाटकर, मुकेश पाटील यांनी कर्मचा:यांचे स्वागत केले.