भुसावळ, जि.जळगाव : कामगार कायद्यात केलेल्या बदलाच्या निषेधार्थ शुक्रवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) तर्फे निदर्शने करण्यात आली.सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया, झोनल वर्कशॉप सचिव पी.एन. नारखेडे, मंडळ सचिव एस.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने श्रम कायद्यात केलेले बदल व डीए थांबविण्याच्या निषेधार्थ सेंट्रल रेल्वे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.आंदोलन अध्यक्ष किशोर कोलते, सचिव डी.यू.इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यात दीपक खराटे, ईश्वर बाविस्कर, विकास सोनवणे, मेघराज तल्लारे, हरिचंद सरोदे, स्वप्नील पाटिल, प्रमोद बविस्कर, राजेश सोनी, सुरेंद्र गांधिले, कुणाल बोंडे, फारुख शेख, भूषण पाटिल, रूबाब तडवी यांच्यासह पदाधिकारी, कमेटी मेंबर व कर्मचारी सहभागी झाले.
भुसावळला सीआरएमएसतर्फे पीओएचमध्ये निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 2:49 PM
कामगार कायद्यात केलेल्या बदलाच्या निषेधार्थ शुक्रवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) तर्फे निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देकामगार कायद्यातील बदलाचा निषेधकामगारांचा डीए थांबवू नये