भुसावळ : भुसावळ स्थानकावरील एक ते आठ फलाटांची लांबी ५० ते ८० मीटरने वाढविण्यात येणार असून स्वयंचलित अप जिन्याचे लोकार्पण खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते १४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.स्थानकावर सौंदर्यीकरण व विकासाची कामे जोमाने सुरू असून सध्या असलेल्या एक ते आठ फलाटांची लांबी जुन्या रेल्वे कोचेस अनुसार होती, परंतु नवीन एलएचबी (लिंकिंग हॉपमॅन बुश) कोचेस आकार व लांबी वाढल्यामुळे फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे.जळगावकडे ७० मीटरने वाढणार लांबीरेल्वे प्रशासनातर्फे नवीन कोचेसची लांबी वाढविण्यात आली आहे. यामुळे फलाटांची लांबी ही सहाजिकच वाढणार आहे सद्यस्थितीला फलाटांची लांबी ५५० मीटर असून फलाटावर साधारण २३ कोचेस उभे राहतात. प्रवासी गाड्यांना २३ ऐवजी २५ ते २६ कोचेस लागणार असून तसेच नवीन डिझाईनमुळे कोचेसची लांबी २ ते अडीच मिटरने वाढणार आहे. त्यामुळे सर्व फलाटांची लांबी जळगावच्या दिशेने वाढणार आहे. राजधानी सुपरफास्ट सारख्या गाड्यांना नवीन कोचेस डिझाईन करण्यात आलेले आहे. भुसावळ विभागातूनही अशाच पद्धतीने नवीन कोचेस असलेल्या प्रवासी गाड्या धावणार आहेत, यामुळे फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे.स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण रेल्वे स्थानकाच्या दोन्ही जुन्या जिन्यांना लागून स्वयंचलित अप जिने लावण्यात आलेले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात लोकार्पण लांबणीवर गेले होते. आता सर्व कार्य पूर्ण झाले असून १४ आॅगस्टला स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे.तसेच फलाट क्रमांक १ ते ८ वर नवीन ६३ खुर्च्याही प्रवाशांच्या सेवेसाठी बसविण्यात आलेल्या आहे त्याचेही लोकार्पण त्याच दिवशी होणार आहे.दरम्यान, रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारासमोर सौंदर्यीकरणासाठी पुणे येथील खडकी मिलिटरी कॅम्पमधून रणगाडा ठेवला जाणार असून दक्षिणेकडील प्रवेशद्वाराचे सुशोभिकरणाचे काम जोमाने सुरू आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या आठ फलाटांची लांबी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:47 AM
भुसावळ रेल्वे स्थानकावरील एक ते आठ क्रमाकांच्या रेल्वे फलाटांच लांबी वाढविण्यात येणार असून येत्या १४ आॅगस्ट रोजी स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण केले जाणार आहे.
ठळक मुद्देभुसावळ रेल्वे स्थानकावर सौंदयीकरण आणि विकास कामे जोरातनवीन रेल्वे कोचेसची लांबी वाढविण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था