भुसावळ : येथील मराठा समाजातर्फे आयोजित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिवाचन सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगोपांग दर्शन घडवले. इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकावर आधारित ही स्पर्धा चार गटात पार पडली. व्यासपीठावर माजी शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, प्राथमिक शिक्षण सभापती ॲड.तुषार पाटील, श्री गाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरूण धनपाल, मराठा समाज मंडळाचे सहसचिव योगेश जाधव उपस्थित होते. डॉ.जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक डी.के.पाटील यांनी केले. स्पर्धेदरम्यान गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या अभिनव व नावीन्यपूर्ण स्पर्धेत सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले.स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.आर. एच. पाटील, मुख्याध्यापक ए. आर. धनपाल, नाट्यकर्मी वीरेंद्र पाटील, डॉ.अनिल पाटील, मनीषा पाटील, जे. बी.पाटील, दीपक वारांगणे व मीरा जंगले यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, सहसचिव योगेश जाधव, स्पर्धा समन्वयक डी. के. पाटील, डॉ.जगदीश पाटील यांच्यासह विजय कलापुरे, कृष्णा शिंदे, सुमित देसले, वैभव गुंजाळ, राहुल पाटील, सचिन पाटील, प्रफुल्ल पन्हाळकर आदींनी परिश्रम घेतले. विजेते असे -पाचवी व सहावीच्या पहिल्या गटात प्रथम संस्कृती योगेश गांधेले (रा. धो. हायस्कूल कुऱ्हे पानाचे), द्वितीय आर्या श्याम निकम (सेंट अलॉयसियस हायस्कूल), तृतीय नम्रता अभय सूर्यवंशी (सेंट अलॉयसियस हायस्कूल). सातवी व आठवीच्या दुसऱ्या गटात प्रथम प्रणिता संदीप पाटील (कोटेचा हायस्कूल), द्वितीय उर्वशी विजय कोळी (कोटेचा हायस्कूल), तृतीय स्नेहल संदीप इंगळे (ज्ञानज्योती विद्यालय खडके). नववी व दहावीच्या तिसर्या गटात प्रथम गौरी सुभाष हलपतराव (सेंट अलॉयसियस हायस्कूल), द्वितीय सौरभ विकास वाणी (महाराणा प्रताप हायस्कूल), तृतीय प्रेरणा अभय सूर्यवंशी (कोटेचा हायस्कूल). अकरावी व बारावीच्या चौथ्या गटात प्रथम श्रद्धा अनिल साळवे (सु. ग. टेमानी ज्युनियर कॉलेज), मेहवीश शेख युनुस (सु. ग. टेमानी ज्युनियर कॉलेज), तृतीय खुशी अनंतकुमार वरणकर (के.नारखेडे ज्युनियर कॉलेज). या विजेत्या स्पर्धकांना शिवजयंतीनिमित्त आयोजित समारंभात शिवव्याख्याते शेख सुभान अली, शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ, मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील, श्रीगाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण धनपाल व महिला पदाधिकारी अलका भगत या मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
भुसावळात अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घडवले शिवरायांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 3:06 PM
इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकावर आधारित ही स्पर्धा चार गटात पार पडली.
ठळक मुद्देसंस्कृती गांधेले, प्रणिता पाटील, गौरी हलपतराव व श्रद्धा साळवे ठरले प्रथमइयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकावर आधारित चार गटात पार पडली ही स्पर्धा