वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सर्वत्र वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे तालुक्यातील ३९ गावांसाठी प्रत्येकी ३ हजार २०० याप्रमाणे एक लाख २४ हजार ८०० वृक्षांची लागवड १ जुलै ते ३१ आॅगस्ट दरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. यामुळे प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तालुका हिरवळ होईल, मात्र फक्त फोटोसेशन करण्यासाठी वृक्ष लागवड केल्यास त्याचा काही उपयोग होणार नाही, वृक्षांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे.राज्यभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे टारगेट देण्यात आले आहे. कागदावरील टारगेट प्रत्यक्षात साकार करणेही तेवढेच गरजेचे आहे. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत भुसावळ तालुक्यातील ३९ गावांना प्रत्येकी ३ हजार २०० वृक्ष याप्रमाणे तब्बल एक लाख २४ हजार आठशे वृक्षांची लागवड होणे अपेक्षित आहे. अनेक गावांमध्ये वृक्ष पोहोचलेसुद्धा आहेत. वृक्ष लागवडाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तालुक्यात हिरवळ येईल व हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरामध्ये प्रभावीपणे वृक्ष लागवडीची अंमलबजावणी झाल्यास निश्चितच तापमानामध्ये घट होईल.पंचायत समितीमार्फत दिलेले वृक्ष अनेक ठिकाणी तसेच पडूनतालुक्यातील ३९ गावांपैकी बहुतांशी गावांमध्ये वृक्षारोपणाचे वाटप करण्यात आलेले आहे. तशी दप्तरी नोंदही करण्यात आलेली आहे. परंतु अनेक गावांमध्ये वृक्ष पोहोचले खरे मात्र ते एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी पडून आहे. वृक्षांचे संवर्धन तर दूर, अजून लागवडसुद्धा झालेली नाही. शासनाला दाखवण्यापुरता एखादा वृक्ष लावून दहा-बारा मंडळी वृक्षाच्या अवती भोवती उभे राहून फोटो काढला जातो. गावात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला याचा गाजावाजा करण्यात येतो.वृक्ष लागवड पाहण्यासाठी पथक तयारगावामध्ये शासकीय उपक्रम असल्यामुळे वृक्ष आणली जातात. मात्र त्यांची स्थिती काय? किती ठिकाणी झाडे लावण्यात आली. त्याच्या संवर्धनाचा कसे करता येईल या सर्व बाबी तपासण्याकरिता पंचायत समिती मार्फत सहा सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. याद्वारे ते गावागावात भेटी देऊन वृक्ष लागवड झाली किंवा नाही याबाबत तपासणी करणार आहे. गोपनीय अहवाल प्रशासनाला सादर करणार आहे कर्तव्यात कसूर करणाºया ग्रामपंचायतींवर प्रसंगी कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.अनेक गावात खड्डा तोच रोप मात्र नव्हेअनेक गावांमध्ये मागच्याच वर्षाचे खड्डे चालू चालू उकरून त्याच खड्ड््यांमध्ये वृक्ष लागवडीची औपचारिकता करण्यात येत आहे, तर अनेक ठिकाणी पाठवलेले वृक्षांच्या फक्त पिशव्या पोहोचले आहे. त्यातील रोपटे गायब झाले असल्याची स्थिती आहे. एकूणच या उपक्रमाला औपचारिकता म्हणून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.भविष्यामध्ये तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी व समाधानकारक पावसासाठी वृक्ष लागवड अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने जबाबदारीने वृक्षलागवड केली पाहिजे. हेच वृष्टी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.भुसावळ तालुक्यात वृक्ष लागवडीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. १ जुलै ते ३१ आॅगस्ट दरम्यान झाडे लावण्याचे उद्दिष्ट असले तरी जुलै शेवटपर्यंत पूर्ण तालुक्यात झाडे लावण्यात येतील. पथकाद्वारे ठिकाणी भेटी देऊन वृक्ष लागवडीची पाहणी करण्यात येईल.- विलास भाटकर, गटविकास अधिकारी, भुसावळ
भुसावळ तालुक्यात एक लाख २४ हजार आठशे वृक्षांनी होणार हिरवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 7:50 PM
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सर्वत्र वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे तालुक्यातील ३९ गावांसाठी प्रत्येकी ३ हजार २०० याप्रमाणे एक लाख २४ हजार ८०० वृक्षांची लागवड १ जुलै ते ३१ आॅगस्ट दरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देवृक्षारोपण ठरू नये केवळ फोटोसेशनवृक्षांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे