वासेफ पटेल।भुसावळ : जंक्शनच्या ठिकाणी शहराच्या मध्यभागापासून कानाकोपऱ्यापर्यंत तब्बल बाराशे रिक्षा चालतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमुळे रिक्षाची चाकं थांबली आहेत. यामुळे शहरातील दररोजची तब्बल सहा लाखाची उलाढाल ठप्प झाल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.जिल्हा निर्मितीकडे वाटचाल सुरू असलेल्या महत्त्वाच्या जंक्शन ठिकाणी ३० पेक्षा जास्त रिक्षा स्टॉप च्या माध्यमातून दररोज बाराशे पेक्षा जास्त रिक्षाचालक संपूर्ण शहराच्या कानाकोपºया पर्यंत शहरवासियांना सेवा देऊन आपला उदरनिर्वाह भागवतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने रिक्षाचालकांवर पयार्यी काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.शहरात रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजचे तसेच बसस्थानक समोरील रिक्षाचे मुख्य थांबे आहेत. या ठिकाणाहून प्रवाशांना साधारण शहराच्या आठ ते दहा किलोमीटर पर्यंत सेवा देण्यासाठी प्रतिसिट १५ ते २० रुपये प्रमाणे भाडे आकारले जाते.दिवसभरातून एक रिक्षा चालक जवळपास ५०० रुपयांपर्यंतची कमाई करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो याच पैशातून रिक्षाचा मेंटेनन्स सुद्धा करत असतो.शासनाने रिक्षा चालकांकडे गाभिर्याने लक्ष द्यावे व त्यांना पर्यायी कामाची व्यवस्था करून द्यावी किंबहुना शासनाच्या अत्यावशक सेवेसाठी रिक्षाचालकांना तरी संधी द्यायला हवी.- दिलीप कोळी, अध्यक्ष, सेन्ट अलाँयसेस स्कूल चालक-मालक परिवहन समिती, भुसावळ.
भुसावळला बाराशे रिक्षाची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 9:28 PM