भुसावळ,दि.19- तापी नदीतील बंधा:याने तळ गाठल्याने शहरवासीयांना गेल्या दोन दिवसांपासून पिवळसर व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासी संतप्त झाले आहेत़ गेल्या अनेक दिवसांपासून शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत असतानाही पालिका प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याचे चित्र आह़े
दरम्यान, हतनूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी दोन हजार 900 क्युसेस पाण्याचे आवर्तन मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास सोडण्यात आल़े हे पाणी चार दिवसानंतर तापीच्या बंधा:यात पोहोचणार आहे, तो र्पयत मात्र नागरिकांना पिवळसर पाणी प्यावे लागणार आह़े
क्लोरिफाक्यूलेटरची दुरुस्ती रखडली
पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र ब्रिटीशकालीन आहे त्यातच क्लोरिफाक्यूलेटरची दुरुस्ती रखडली आह़े पालिका प्रशासनाने तातडीने याबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े उन्हाळ्यातील पाणीटंचाईची परिस्थिती पाहता भुसावळ शहरासाठी दोन हजार 900 क्यूसेस पाण्याचे आवर्तन मंगळवारी रात्री 10 वाजता हतनूर धरणातून सोडण्यात आल़े पहिल्या व दुस:या दिवशी प्रत्येकी एक हजार तर तिस:या दिवशी 900 क्यूसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे पाणीपुरवठा अभियंता एस़आऱपाटील यांनी दिली़