जळगाव : तालुक्यातील फुपनगरी या एकाच वाळूगटासाठी 19 कोटी 99 लाख 38 हजार 381 रुपयांची बोली लागली आहे. आता र्पयतची ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सर्व गटांमधून जिल्हा प्रशासनाला 16 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. दरम्यान, यंदा आतार्पयत 13 वाळू गटांचे लिलाव झाले आहे. तीन जणांनी लावली बोलीफुपनगरी येथील या वाळू गटासाठी जळगावातील श्री सिद्धी विनायक इंटरप्रायजेसतर्फे राहुल अशोक तिवारी यांनी 19 कोटी 99 लाख 38 हजार 381 रुपयांची बोली लावली आहे. त्यासाठीची 20 टक्के अनामत रक्कम म्हणून 22 लाख 3 हजार 381 रुपये भरलेले आहे. तिवारी यांच्या खेरीज या गटासाठी धनराज घुले (जळगाव) यांनी दोन कोटी 27 लाख 18 हजार 381 रुपयांची तर व्ही.के. इंटरप्रायजेसतर्फे विलास यशवंते (जळगाव) यांनी एक कोटी 61 लाख 58 हजार 381 रुपयांची निविदा दाखल केलेली होती. यातील या दोघांसह तिवारी यांच्या बोलीमध्ये बराच फरक आहे. 44 वाळू गटजिल्ह्यात एकूण 44 वाळू गट जिल्हा प्रशासनाने लिलावात काढले आहेत. त्यांना ठेकेदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आतार्पयत केवळ 13 वाळू गटांचे लिलाव झाले आहेत. गेल्या वर्षी सर्व वाळू गट मिळून 16 कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. मात्र यंदा लिलावात काढलेल्या 44 वाळूगटांना अल्प प्रतिसाद असताना फुपनगरी या एकाच वाळू गटास तब्बल 19 कोटी 99 लाख 38 हजार 381 रुपयांची बोली लागल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
फुपनगरी वाळू गटास 20 कोटींची बोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2017 12:57 AM