आॅनलाईन लोकमतबिडगाव ता. चोपडा, दि.३१ : येथे एक मे रोजी न झालेली ग्रामसभा गुरूवारी सरपंच खातुनबाई तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत आवारात घेण्यात आली. या वेळी गावात विकास कामे होत नसल्याचा आरोप गावकºयांनी केला. तसेच ग्रामसेवकाकडून प्रोसेडींग बूक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला.गुरूवारी सकाळी आयोजीत ग्रामसभेत ग्रामसेवक के.आर.सपकाळे यांनी प्रोसेडींग बुकवर कमीत कमी शंभर सह्या करा, तरच सभा सुरू होणार असे सांगितले. त्यामुळे सह्या घेतल्या जात असतांनाच ग्रामस्यांनी विकास कामांबाबत प्रश्नांचा भडीमार करत गोंधळ घातला. यावेळी काही ग्रामस्थांनी ग्रामसेकाकडून प्रोसेडींग बुकच हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामसेवक सपकाळे यांनी हे बूक आपल्या बगलेत दाबून ठेवत सभेतून काढता पाय घेत कार्यालय काढले. आणि सभा कोरम अभावी तहकुब केल्याचे जाहीर केले. परंतु कार्यालयातही ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाला घेराव घातलाने गोंधळ बराच वेळ सुरू होता. एवढा सर्व गोंधळ सुरू असतांनाही ग्रा.पं.च्या पुरूष सदस्यांनी ग्रामपंचायतीकडे फिरकण्याची तसदी घेतली नाही.बिडगाव येथे १ मे रोजी ग्रामसभा घेतली नव्हती, म्हणुन ३१ मे रोजी सकाळी अकरा वाजता ही सभा सरपंच खातुनबाई कादर तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसरपंच शकुंतलाबाई पाटील व महिला सदस्या हजर होत्या. सभेत ग्रामस्थांनी गावात विकास कामे होत नाहीत. गटारींची अवस्था अतिशय दयनिय आहे. शौचालयाचे बोगस व अपुर्ण कामे, घरकुलांचा प्रश्न तसेच मागील ग्रामसभेतील ठरावांची अंमलबजावणी न करता नेहमी वेळ मारून नेली जाते, आदी मुद्यावरून प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अशातच ग्रामसेवकाने सह्या अपुर्ण आहेत, कोरम पुर्ण न झाल्याने सभा तहकुब करावी लागेल असे सांगताच एकच गोंधळ झाला. गावकºयांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे धाव घेत थेट प्रोसेडींग बुकच हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीतही ग्रामसेवकाने ते बुक बगलेत धरत तेथून काढता पाय घेत कार्यालय गाठले. दरम्यान, कार्यालयातही ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.त्यामुळे कोरमअभावी सभा स्थगीत करून ती येत्या सात जून रोजी घेण्यात येणार असल्याचे गोंधळातच घोषीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ हजर होते. मात्र पुरूष सदस्य व अनेक विभागाचे प्रतिनिधींनी दांडी मारली होती.
विकास कामे होत नसल्याच्या मुद्यावरून बिडगाव ग्रामसभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 8:28 PM
चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे गुरूवारी आयोजीत ग्रामसभेत गावकऱ्यांनी गावात विकास कामे होत नसल्यावरून प्रश्नांचा भडीमार केल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रामसेवकाकडून प्रोसेडींग बूक हिसकावण्याचाही यावेळी प्रयत्न झाला.
ठळक मुद्देग्रामस्थांनी ग्रामसेवकाकडून प्रोसेडींग बूक हिसकावण्याचा केला प्रयत्नग्रामसेवकाने ग्रामसभेतून घेतला काढता पायतहकूब ग्रामसभा ७ जून रोजी घेण्याचे घोषीत