लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजपमध्ये जाण्याचे तूर्तास प्रयोजन नाही, असे सांगणारे शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यावेळी खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र, त्यास खडसेंनी नकार दिला. आता मात्र त्यांनी स्वत:च भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. गौणखनिज प्रकरणी एकनाथ खडसे व कुटुंबाला १३७ कोटींचा दंड ठोठावला होता. नुकताच हा निर्णय शासनाने रद्द केला. भाजपकडून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना आपण शरद पवार गटाकडून लोकसभा लढणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र, रक्षा यांना भाजपने उमेदवारी घोषित केल्यानंतर खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.
रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटातच nएकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असले, तरी त्यांच्या कन्या व शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटामध्येच राहणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी दिली.nखडसेंच्या भाजप प्रवेशामुळे रोहिणी यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र त्यांनी शरद पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपतील प्रवेशाची बातमी खरी आहे. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अजून प्रवेश झालेला नसल्यामुळे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही.- एकनाथ खडसे,आमदार, शरद पवार गट