नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली.उन्मेश पाटील यांची खासदार म्हणून निवड झाली. आम्हा वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमी लोकांच्या त्यांच्याकडून फारआहे. तसा खान्देश हा पर्जन्यमानात उत्तम असा प्रदेश होता. बाराही महिने नद्या-नाले, तलाव विहरी तुडूंब भरल्या असत. परंतु गेल्या १० ते १५ वर्षात प्रचंड वृक्षतोड, शहरीकरण, राष्टÑीय महामार्गमुळे दुतर्फा झाडी तोडली गेली व वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन याबाबत प्रचंड शासकीय उदासिनता तर नागरिकांकडे साधन व सामग्रीची कमतरता त्यामुळे फक्त कागदावरच वृक्षरोपण दिसून येते. दरवर्षी त्याच जागेवर वृक्षरोपण होऊन नंतर देखभाल अभावी ती रोपे मरून जातात. उन्मेश पाटील यांनी स्वत: लक्ष घालून आता या वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला चळवळीचे स्वरूप देऊन पुन्हा खान्देश हिरवागार व संपन्न करावा ही अपेक्षा. त्यांनी जर सामाजिक संस्था, रोटरी, लायन्स, जेसीस, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ग्रामपंचायत, नगरपालिका, म.न.पालिका, जिल्हा परिषद इ. व त्यांच्या सोबत प्रशासन सामाजिक वनीकरण आणि वनविभाग यांच्या संयुक्तविद्यमाने ५ वर्षाचा एक कलमी कार्यक्रम लावला तर या जिल्ह्याचे तापमान २ ते ३ अंशने कमी होऊ शकते. खासदारांनी वृक्ष लागवडीच्या स्पर्धा लावाव्या. संस्थांना शासनातर्फे मोफत रोपे व पाणी पुरवठा करावा, त्यांना योग्य बक्षीस द्यावे. शकतोवर दाट सावलीची झाडे लावावी. शहरात गेल्या ३० वर्षांपासून वृक्ष लागवडीच्या प्रयत्नात चांगले यशस्वी झालो. प्रशासन, नागरिक, सामाजिक संस्था, व्यक्तींंची उत्तम साथ आहे.- विजय वाणी, पर्यावरण प्रेमी
पर्यावरण प्रेमींच्या मोठ्या अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:53 PM