n लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आता नाशिकची ओळख केवळ तंत्र-मंत्र भूमी अशी राहिलेली नसून नाशिकचे नाव मेडिकल टुरीझमसाठीदेखील नावारुपाला येत आहे. अनेक कार्पोरेट हॉस्पिटल्स, लॅबरोटरीज व नामांकीत डॉक्टर्स आदींनी नाशिकमध्ये सुरुवात केली असून भविष्यातदेखील अनेक हॉस्पिटल नाशिकमध्ये सुरू होणार आहेत.
या पैकी बहुतेकांनी कॉलनी परिसराला प्राधान्य दिले असून या परिसरात नाशिकचा मेडिकल हब साकारत आहे. त्यासाठी या परिसरात मोठी पार्किंग तसेच हॉस्पिटल वा दवाखान्यासाठी आवश्यकता असलेल्या सुविधा असणाऱ्या प्रोजेक्टची आवश्यकता होती. त्यामुळे ललित रुंग्टा ग्रुप नाशिकच्या या परिसरातच मुख्य रस्त्यांचा संगम होतो अशा चांडक सर्कल जवळ छोट्या क्लिनिकपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलस् सर्जिकल व मेडिकल शॉप्स, ऑफिसेस इत्यादींसाठी अद्यायवत सुविधा असणाऱ्या प्रोजेक्टची निर्मिती करीत असून यामध्ये स्ट्रेचर लिफ्टची सुविधा, स्वतंत्र लिफ्टचे ऑप्शन, कस्टमाईज्ड फ्लोअर प्लेटस्, मुबलक पार्किंग असणार आहे. शिवाय या प्रोजेक्टचे बुकिंग हे २४ ते २७ डिसेंबरदरम्यान करता येणार आहे. या कालावधीत बुकिंग केल्यास मूळ किंमतीच्या ६६ टक्के इतक्याच किंमतीत शॉप घेता येणार आहे. छोट्या गुंतवणुकीतून मोठ्या खरेदीची सुवर्णसंधीच लाभणार आहे. (वा.प्र.)