जळगाव : वृद्धेचा मृत्यूनंतर झालेली कारवाईनंतर वैद्यकीय क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे़ घटना अगदी वाईट होती, मात्र, चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार या घटनेत झाल्याचा सूर उमटत आहे़ दुसरीकडे प्रशाकीय चूकीमुळे सगळे होत असताना काम करणाऱ्या डॉक्टरांवर त्याचा ठपका ठेवणे चुकीचे असल्याचे काही तज्ज्ञ डॉक्टर्सनी नमूद केले आहे़ त्यात जळगावात पुरेशा यंत्रणा नसताना सिव्हीलला कोविड रुग्णालय करणे ही प्रशासनाची अक्षम्य चूक असल्याचे या डॉक्टरांनी म्हटले आहे़याबाबत आयएमए हॉस्पीटल बोर्डाचे कोषाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, आयएमएचे माजी सचिव डॉ. विलास भोळे व आयएमएचे माजी सहसचिव डॉ. राजेश पाटील यांना 'लोकमत'ने काही प्रश्न विचारले. त्याचा हा गोषवारा...डॉ़ विलास भोळे (आयएमएचे माजी सचिव)1 'डीन' हे प्रमुख असल्याने सर्व नियंत्रणाची त्यांची जबाबदारी होती़ मात्र, दोघा डॉक्टरांवर जी कारवाई झाली ती अत्यंत चुकीची आहे़ डॉ़ सुयोग चौधरी व कल्पना धनकवार हे उपचार करणारे आहेत़ त्यामुळे त्यांच्या जबादारीनुसार त्यांनी पोलिसांना माहिती दिली़ मात्र, पुढील कार्यवाही ही पोलिसांनी करणे अपेक्षित होते़ अशा स्थितीत डॉक्टरवरील कारवाई पूर्णत: चुकीची असून आयएमएतर्फेया कारवाईचा निषेध करण्यात आला आहे़याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत2 औषधवैद्यकशास्त्र विभागाची उपचाराची प्रमुख जबाबदारी असते, मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने या ठिकाणी अन्य विभागाच्या डॉक्टर्सचीही मदत घेण्यात आली़ मात्र, या ठिकाणी कारवाई करताना इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे़ कनिष्ठ डॉक्टरांनाच बळीचा बकरा बनविण्यात आले आहे़3 सिव्हीलचे कोविड रुग्णालय करणे हा निर्णय अत्यंत चुकीचा होता़ कोविडसाठीची उपचार पद्धती, त्या सुविधा या ठिकाणी आहेत का ? याची तपासणी होणे अपेक्षित होते़ आॅक्सिजन मुबलक प्रमाणात असणे गरजेचे असताना या ठिकाणी तशी सुविधा नव्हती मग हा निर्णय का घेण्यात आला़ ?4 आता लॉकडाऊन वाढविणे शक्य नाही, आहे त्या परिस्थितीचा सामना करावा लागेल मात्र, ही परिस्थिती सुधारू शकते, प्रशासनाने आताही एक समिती नेमावी त्यात आयएमएचे डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असावा त्यानुसार निर्णय घ्यावे, काय आहे काय नाही, याचा सल्ला घेऊन त्याची पुर्तता करावी, सात दिवसात परिस्थिती सुधारू शकते़डॉ़ अनिल पाटील (हॉस्पिटल बोर्डाचे कोषाध्यक्ष)1 डॉक्टर पीपीई किट घालून शौचालयांची तपासणी कसे करणाऱ त्यामुळे दोन डॉक्टरवर ठेवलेला ठपका व केलेली कारवाई ही अत्यंत चुकीची आहे़ त्यांनी पोलिसांना सांगितले होते़ पोलिसांनी पुढील कार्यवाही करायला हवी होती़ हे केवळ बड्या धेंड्यांना वाचविण्याचा प्रकार आहे़ ही कारवाई तातडीने मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे़2 औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक हे कक्षात जातही नाहीत, केवळ कॅबीनमध्ये बसून ड्युट्या लावण्याचे कामे करतात़ त्यांची प्रमुख जबाबदारी असताना अन्य विभागाच्या कनिष्ठ डॉक्टरर्सवर जबाबदारी टाकली जाते़3 'डीन' यांची सर्व प्रशासकीय जबाबदारी आहे़ आलेल्या निधीचा विनियोग व्यवस्थित झालेला नाही. खर्चही झालेला नाही़ त्यामुळे कामेच झाली नाही़ सर्व असल्यास दहा दिवसात यंत्रणा उभी राहू शकते़ सर्वत्र आधी जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णालय करणेहा निर्णय राज्यभर झाला होता़ त्यामुळे या ठिकाणीही तसा निर्णय घेण्यात आला़4 आयएमएने नेहमीच प्रशासनाला सहकार्य केलेले आहे़ प्रशासनाने जिल्हा समिती नेमावी त्यात प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्टर यांचा समावेश असावा़ त्यांनी सिव्हीलचा राऊंड घ्यावा, अशा उपाययोजना कराव्यात, वेळ गेलेली नाही़ आताही परिस्थिती सुधारू शकते.डॉ़ राजेश पाटील (आयएमएचे माजी सहसचिव)1 डॉक्टरांची निलंबनाची कारवाई ही अत्यंत चुकीची आहे़ ही पूर्णत: रुग्णालय प्रशासनाची चूक आहे़ प्रशासनाने त्यांची जबाबदारी पार पाडावी डॉक्टरांना रुग्णसेवेचे काम करू द्यावे, या कारवाईमुळे डॉक्टरांमध्ये उदासीनता आहे़ डॉक्टरांनी पोलिसांना कळविले होते़ त्यानुसार पोलीस व रुग्णालय प्रशासनाचे हे काम होते़ त्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनावर कारवाई व्हायला हवी़2 गाईडलाईन्स नुसार रुग्णालयात मनुष्यबळ आहे का, कशी परिस्थिती आहे? याचे नियोजन आधी होणे गरजेचे आहे़ त्यानुसार प्रत्येकाला जबाबदाºया दिल्या गेल्या आहेत का ?ते काम करत आहेत का? हे पाहणे प्रशासनाचे काम आहे. त्यांनी ते करावे़3 कुठलीही पुरेशी सामुग्री नसताना, मनुष्यबळ नसताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कोविड रुग्णालय घोषित करणे हा चुकीचा निर्णय होता़ या ठिकाणी सेंट्रल आॅकिसजन सिस्टीम नव्हती, पुरेसे मनुष्यबळ नव्हते़ आधी याबाबींची पूर्तता आहे का हे तपासणे महत्त्वाचे होते़ त्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता़ मनुष्यबळाचा मुद्दा वारंवार ऐरणीवर असताना आता १६डॉक्टर्सला पाठविले जात आहे़ अडिच महिन्यांच्या आधीच हे केले असते तर परिस्थिती सुधारली असती.4 गाईडलाईन्सनुसार स्टाफ ठेवावा, त्यांच्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, एखाद्या डॉक्टरांना प्रशासकीय कारवाईत समाविष्ट करावे, मग निर्णय चुकणार नाहीत़ आता अडीच महिन्यांनी उपाययोजना केल्या जात आहे चुकीचे आहे़ आधीच याची पूर्वतयारी केली गेली तर मृत्यूदर व रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले असते़
पुरेशी यंत्रणा नसताना कोविड रुग्णालय जाहीर करणे सर्वात मोठी चूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:28 AM