आज मराठी नाटकाला महाराष्ट्रातला प्रेक्षक पारखा झाला आहे. गावोगावी नाटय़गृहे आहेत खरी; पण ती नाटकावाचून सुनी आहेत. पूर्वी मुंबई पुण्याकडच्या नाटक कंपन्या नाटकाचे दौरे काढून महाराष्ट्र पिंजून काढत असत. गावोगावी नाटक होत असे. सोबत स्थानिक हौशी नाटय़ कलावंत आपापली कला सादर करीत असत. एकूणच उत्साहाचे वातावरण होते. जितके नाटकाचे प्रयोग मुंबई-पुण्यात व्हायचे तितकेच किंबहुना जास्तच बाहेर व्हायचे. कालांतराने हा उत्साह मावळला. दूरचित्रवाणी, मोबाइल, संगणक या अनेकांनी मानवी जीवनावर आक्रमण केले आणि जगण्याची, करमणुकीची परिमाणं बदलली. माणूस आत्ममगA व्हायला लागला. त्याला समाजाची गरज भासेनाशी झाली. त्याचं एकटेपण हे राहिलं नाही. हातातल्या मोबाइलमध्ये तो रममाण झाला. त्याला नाटय़गृहात जावून नाटक पहाण्याची गरज उरली नाही. वेळ आणि पैसा दोन्हीची तो बचत करू लागला म्हणाना! याने झालं काय की नाटक अस्ताला जाते की काय असे भय निर्माण झाले. आजही मराठी नाटकाची स्थिती ही जवळपास अशीच आहे.
जन्मकथा एका नाटकाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2017 1:55 PM
आज मराठी नाटकाला महाराष्ट्रातला प्रेक्षक पारखा झाला आहे. गावोगावी नाटय़गृहे आहेत खरी; पण ती नाटकावाचून सुनी आहेत.
राज्य शासनाने सुरू केलेल्या नाटकांना जे काही अनुदान मिळते ते जणू मरणासन्न रुग्णाला सलाईन लावून जिवंत ठेवावे अशीच अवस्था आहे आणि हे येवढे सारे असूनही मराठी नाटकाचे निर्माते मात्र स्वत:च्याच विश्वात गर्क आहेत. मिळणा:या फक्त शनिवार आणि रविवारच्या बूकींगमधे आणि अनुदानाच्या भिक्षेत ते समाधानी आहेत. अर्थात त्यांचेही काही चुकत नाही. एक तर त्याना दूरचित्रवाणीशी फाईट द्यायची आहे . त्यातून प्रेक्षकांना म्हणे नाटकात सेलेब्रिटीच लागतो. त्यामुळे असा सेलेब्रिटी जर नाटकात घ्यायचा म्हणजे त्याच्या तारखा, त्याचं मानधन आणि बाकी अनेक मुद्यावर त्याला तडजोड करावी लागते. वाहतूक खर्च परवडत नाही. नटांच्या नाईटस् परवडत नाही, होणारे खर्च व मिळणारे बुकिंग याचे प्रमाण व्यस्त आहे. मग कशाला तो मुंबईबाहेरच्या प्रेक्षकांचा विचार तो करत बसेल?
या सा:याच मुद्यांवर विचार करताना एक बाब ठळकपणे समोर आली ती म्हणजे आज मुंबई पुणेवगळता संपूर्ण महाराष्ट्र हा नाटकाविना उपाशी आहे. त्याला नाटक तर पहायचे आहे पण नाटक नाही अशी स्थिती आहे. मग काय करता येईल याचा विचार सुरू झाला. परिस्थिती तर आटोक्यात नाही पण नाटक तर झाले पाहिजे. नाटक होत नाही कारण ते आर्थिकदृष्टय़ा ते परवडत नाही. मग ते परवडेल कसे याच्याविषयी मंथन सुरू झाले. सगळ्यात मोठा खर्च येतो तो म्हणजे वाहतुकीचा खर्च. या खर्चात मोठा वाटा हा नाटकाच्या नेपथ्याच्या, सामानाच्या वाहतुकीचा असतो आणि मग त्यानंतर होणारी कलावंतांची वाहतूक.
पहिला विचार केला आणि निर्णयाप्रत आलो ते हे की नाटकाचा खर्च कमी करताना पहिला भर द्यायचा तो वाहतूक खर्चावर. हा खर्च कमी करण्यासाठी नाटकाचे नेपथ्यच जर गौण ठरवले तर? म्हणजे नेपथ्याशिवाय नाटक केले तर? नेपथ्याशिवाय केलेल्या तरीपण गाजलेल्या नाटकांचा संदर्भ लक्षात घेता हे शक्य होते. गाढवाचं लगA, विच्छा माझी पुरी करा, व:हाड निघालंय लंडनला (एकपात्री प्रयोग ). हे काही रंगमंचावर सादर होताना नेपथ्याविनाच होत असून, प्रचंड लोकप्रिय झालेले होते. मग हाच फॉम्यरुला आपण वापरला तर? नाटक करायचे ते विना नेपथ्याचे. ज्या नाटकाला कोणताही विशिष्ठ रंगमंच लागणार नाही. - हेमंत कुलकर्णी