जळगाव : गर्भधारणेचा काळ पूर्ण होण्यापूर्वीच सातव्या महिन्यात एका महिलेची प्रसूती होऊन दोन तोंडाचे बाळ जन्माला आले. मात्र काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी जिल्हा रुग्णालयात घडली. एरंडोल तालुक्यातील एक गर्भवती महिला गुरुवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेचे पूर्ण ९ महिनेदेखील झालेले नव्हते. मात्र गर्भपिशवीचे तोंड उघडे झाल्याने तिची सातव्या महिन्यातच प्रसूती झाली. या बाळाला दोन पूर्ण तोंड असण्यासह चार डोळे, दोन नाक होते. जन्मताच त्याचा मृत्यू झाला. मातेला दु:ख अनावरबाळ जन्माला तर आले मात्र ते दगावल्याने या महिलेला दु:ख अनावर झाले. बाळ दोन तोंडाचे असले तरी शेवटी पोटचा गोळा काही क्षणातच हिरावला गेल्याने तिला शोक अनावर झाला होता. बघ्यांची गर्दी दोन तोंडाचे बाळ जन्माला आल्याचे माहिती होताच या बाळाला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होते.अगोदरच समजली असती स्थितीगर्भधारणेनंतर काही महिन्यातच बाळ कसे आहे हे तपासणी दरम्यान समजले असते. मात्र परिस्थिती नाजूक असल्याने तपासणी शक्य नव्हती. त्यामुळे या गर्भाची एवढी वाढ झाली, असे वैद्यकीय सूत्रांच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात विचित्र बाळाचा जन्म
By admin | Published: March 24, 2017 12:36 AM