लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - भाजपकडून अनेक खलबते झाल्यानंतर गुरुवारी होणाऱ्या महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महापौरपदासाठी प्रतिभा कापसे, तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांचे नाव जाहीर करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी दिली आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेसदेखील भाजपकडून महापौर व उपमहापौरपदासाठीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली नव्हती. यामुळे भारती सोनवणे व मयूर कापसे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे गुरुवारी महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत माघारीच्या वेळेस भारती सोनवणे व मयूर कापसे हे आपले उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याची माहिती बालाणी यांनी दिली. दरम्यान, प्रतिभा कापसे व सुरेश सोनवणे यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. भाजपकडून उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांचे नाव दिल्यामुळेच नगरसेवकांची नाराजी वाढली असल्याचे कुलभूषण पाटील यांनी सांगितले होते. मात्र, तरीही भाजपने उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांचे नाव निश्चित केले आहे.