शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

भाजपाचा ५० वर तर माझा ७५ जागांवर दावा : माजी मंत्री सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 7:02 PM

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे ७५ उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत युती झालेली नाही. भाजपा ५० जागांवर दावा सांगत असेल तर आमचे ७५ उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी संध्याकाळी शिवाजी नगरातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप करताना व्यक्त केला.

ठळक मुद्देललित कोल्हे यांच्या जाण्याचा धक्का नाहीआता युती होईल असे वाटत नाहीराजकारणात अनेक गोष्टी अनुभवल्या आहे.

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे ७५ उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत युती झालेली नाही. भाजपा ५० जागांवर दावा सांगत असेल तर आमचे ७५ उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी संध्याकाळी शिवाजी नगरातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप करताना व्यक्त केला.महापालिकेत सद्यस्थितीत युती नाहीजळगावच्या विकासासाठी भाजपा व शिवसेना यांची युती व्हावी यासाठी मी आग्रही होतो. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर प्राथमिक स्वरूपात काही चर्चा देखील झाली. मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा व शिवसेना दोघांनी ७५ अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी युती झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आता युती होईल असे वाटत नाहीदोन्ही पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता युती होईल असे वाटत नाही. युती करण्याबाबत आपल्याकडे नव्याने कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ललित कोल्हे यांच्या जाण्याचा धक्का नाहीमहापौर ललित कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारल्यानंतर ललित कोल्हे यांना तरूण व होतकरू म्हणून प्रमोट केले होते. मात्र त्यांना भाजपामध्ये त्यांचे चांगले भविष्य दिसले असेल तर त्यात काही नवीन नाही. राजकारणात अनेक गोष्टी अनुभवल्या आहे. त्यामुळे ललित कोल्हे यांच्या जाण्यामुळे मला काही धक्का वैगरे बसला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले....तर माझा ७५ जागांवर दावामहापालिका निवडणुकीत भाजपाने ५० जागांवर दावा केला आहे. याबाबत विचारल्यानंतर भाजपा ५० जागांवर दावा करीत असेल तर मी ७५ जागांवर दावा करीत असल्याचे सुरेशदादा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक