जळगाव : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या गाड्यांवर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध भारतीय जनता युवा मोर्चाने केला आहे. या आधी देखील बंगालमध्ये भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्यावर देखील हल्ला झाला होता. या हल्ल्याचा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सचिन पानपाटील , महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे नगरसेवक राजु मराठे, युवा मोर्चा जिल्हा महानगर सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी , महेश पाटील, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, विक्की सोनार, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, रियाज शेख ,जयेश ठाकुर, चिटणीस प्रतिक शेठ ,सागर जाधव, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील,कार्यालय मंत्री भुषण पाटील, भूषण जाधव, महेश लाठी , जयंत चव्हाण, अबोली पाटील, जयेश भावसार , महिला जिल्हा रेखा वर्मा, सरोज पाठक ,शोभा कुलकर्णी, नीला चौधरी, सविता बोरसे, पुजा चौधरी, तृप्ती पाटील , उपस्थित होते.
भाजयुमोने केला नड्डा यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:31 AM