शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

वॉटरग्रेसवरून भाजप नगरसेवक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:12 PM

आधी पाठींबा मग विरोध नंतर पुन्हा पाठींबा : भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफार्ईचे काम पाहणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा एकवेळेस संधी देण्याबाबात भाजपमध्ये एकमत होत असताना दुसरीकडे भाजपचेच महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे यांनी वॉटरग्रेसला पुन्हा संधी देण्यास विरोध दर्शविला आहे. तसेच दोघांनीही आपली बाजू मांडत याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर सोपविली आहे. वॉटरग्रेसला आधी पाठिंबा मग विरोध नंतर पुन्हा संधी देण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याने भाजप अंतर्गत गटबाजी देखील उघड झाली आहे. तसेच यावरून शिवसेना व एमआयएमने आयुक्तांवर जबाबदारी सोपवित यातून तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीत भाजपमध्येच वॉटरग्रेसला मक्ता देण्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.महापालिकेकडून जून २०१९ मध्ये ७५ कोटींचा शहराच्या दैनंदिन सफार्ईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला होता. मात्र, हा मक्ता देताना अनेक सत्ताधाºयांचा विरोध होता. असे असतानाही पक्षश्रेष्ठींचा दबावापुढे हा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला. मात्र, सहा महिन्यातच संबधित मक्तेदाराकडून शहराच्या सफाईचे काम व्यवस्थित न झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मक्त्याला विरोध केला व संबंधित मक्तेदाराकडून हे काम थांबविण्यात यावे यासाठी आग्रह धरला. त्यानुसार फेब्रुवारी २०१९ पासून या ठेकेदाराचे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनीदेखील हा मक्ता रद्द करण्याबाबत नगरसेवकांची बैठक घेतली होती. मात्र आता पुन्हा मक्ता देण्यात येत असल्याने वाद उफाळून आला आहे.आमनेभगत बालाणी, गटनेते, भाजप१. सुरुवातीला वॉटरग्रेस कंपनीने सफाईचे व्यवस्थित काम न केल्याने हा ठेका रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला.२. वॉटरग्रेसला पाठिंबा आधी नव्हता. प्रशासनाने तो निर्णय घेतला होता.३. वॉटरग्रेसला मक्ता देताना विरोध होता. मात्रसंबंधित कंपनीला निविदाप्रक्रियेतून हा मक्ता देण्यात आला.४. सहा महिन्याचा कामात वॉटरग्रेस कंपनी पूर्णपणे अपयशी ठरली. त्यामुळे हा मक्ता रद्द करण्यासंदर्भात महासभेत पक्षाच्यावतीने निर्णय घेण्यात आला.५. आता वॉटरग्रेसला संधी न दिल्यास मनपासमोर कायदेशीर अडचणी समोर येवू शकतात. त्यामुळे या अडचणी टाळण्यासाठी कंपनीला एक संधी द्यावी.६. मनपा आयुक्तांनीच याबाबत निर्णय घ्यावा. मात्र यात मनपाचे हितही जोपासले जावे.सामनेकैलास सोनवणे, नगरसेवक१. मक्ता हा निविदेनुसार देण्यात आला होता.२. वॉटरग्रेसला काम दिल्यानंतर सहा महिन्यात शहराच्या सफाईचे काम कशाप्रकारे झाले, याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनीच आवाज उठविला.३. शहराच्या सफाईचे काम पूर्णपणे होत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनुसार हा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली. फेब्रुवारीपासून हा मक्ता रद्द करण्यात आला.४. सफाईचे काम होत नसल्याने नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्याविरोधात आवाज उठविला, प्रशासनातील अधिकाºयांनी माझ्या विरोधात गुन्हे दाखल केले.५. वॉटरग्रेसला संधी देण्याबाबत आपला विरोध कायम आहे. जळगावकरांचे हित जो पाहणार नाही त्याला आपला विरोध कायम राहणार आहे.६. वॉटरग्रेसच्या ठेक्याबाबत प्रशासनाने मनपाचे हित लक्षात घेवून निर्णय घ्यावा.वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर सहा महिने त्यांच्या कामाचा अंदाज घेतला असता अनेकांकडून त्यांच्या कामाबाबात समाधान व्यक्त केले जात नव्हते. केवळ सत्ताधारी किंवा विरोधकच नाही तर नागरिक देखील वॉटरग्रेसच्या कामाबाबत नाराज होती. त्यामुळे हा मक्ता रद्द करण्याची मागणी करण्यात आली. फेब्रुवारीपासून हे काम थांबविण्यात आले होते. आता मक्ता देण्याबाबत आमचा विरोध कायम आहे. मात्र, काही कायदेशीर अडचणी येवू शकतात असे मत आयुक्तांनी व्यक्त केले. त्यामुळे याबाबत आयुक्तांनीच निर्णय घेण्याबाबतचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत.-अनंत जोशी, गटनेते, शिवसेनाजळगाव शहराची सफार्ईच्या कामात सुधारणा व्हावी या उद्देशाने प्रशासनाच्या निर्णयाला पाठींबा देण्यात आला होता. मात्र, सहा महिन्यात वॉटरग्रेसचे काम पाहता, ते समाधानकारक नव्हते. त्यामुळे त्यांचे काम थांबविण्यात आले. मात्र, त्यांच्या मक्ता रद्द केल्यास महापालिका प्रशासनाला भविष्यात काही कायदेशीर अडचणी निर्माण होवू शकतात. त्यामुळे वॉटरग्रेसला पुन्हा संधी देण्याबाबतचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.-रियाज बागवान, गटनेते, एमआयएम

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळाJalgaonजळगाव