अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदावर भाजपचे प्रफुल्ल पाटील यांची १२ विरुद्ध ४ मतांनी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक जी.एच.पाटील होते.उदय वाघ यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. ११ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. एकूण १८ संचालकांपैकी उदय नंदकिशोर पाटील यांना नुकतेच अपात्र ठरविण्यात आले होते.दुपारी १२ वाजता उमेदवारी भरण्याबाबत प्रक्रिया सुरू केली. वाघ गटातर्फे प्रफुल्ल पाटील, तर आ.चौधरी गटातर्फे पद्माकर गोसावी यांनी अर्ज भरला होता. १२ संचालकांनी आपले मत उदय वाघ गटाचे प्रफुल्ल पाटील यांना दिले. ४ संचालकांनी चौधरी गटाचे पदमाकर गोसावी यांच्या बाजूने मतदान केले. उपसभापती अॅड. श्रावण सदा बह्मे, पराग पाटील, विजय प्रभाकर पाटील, पावबा पाटील, विश्वास पाटील, मंगला पाटील, उज्ज्वला पाटील, हरी वाणी, शंकरलाल बीतराई, भगवान कोळी, सुरेश पाटील, महेश देशमुख उपस्थित होते.यावेळी भाजपच्या आ.स्मिता वाघ, मा.आ.साहेबराव पाटील, पं.स. सभापती वजाबाई भिल्ल, माजी उपसभापती श्याम अहिरे, माजी नगरध्यक्ष विनोद पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, अर्बन बँक चेअरमन पंकज मुंदडे, व्हा.चेअरमन प्रवीण जैन, उपनगराध्यक्ष विनोद लाबोळे, जि.प.सदस्य मीना पाटील, संगीता भिल्ल, सोनू पवार, पं.स.सदस्य रेखा पाटील, विनोद जाधव, बाधकाम सभापती मनोज पाटील, महेश पाटील, राजेंद्र यादव, सुरेश पाटील, अयाज पठाण, शीतल देशमुख आदी उपस्थित होते.आमदार चौधरींच्या गटाचा पराभवबाजार समितीत अमळनेर पॅनेल, जिल्हा मध्यवर्ती बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नंदुरबार महापालिका व आता बाजार समिती सभापती निवडीतही विद्यमान आमदारांच्या गटाचा पराभव झाल्याची टीका भाजप कार्यकर्त्यांनी केली.चौकटी--गोसावींची हरकत फेटाळलीपद्माकर गोसावी यांनी सभापती निवडीबाबत तांत्रिक दोष दाखवला. यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने निवड प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी करणारा अर्ज दिला. मात्र निवडणूक अधिकारी जी.एच.पाटील यांनी हरकत फेटाळली.चौथे मत कुणाचे?आमदार चौधरी गटाचे स्वत: पद्माकर गोसावी, सुरेश पाटील, महेश देशमुख यांच्याव्यतिरिक्त चौथे मत कुणाचे मिळाले याबाबद्दल चर्चा सुरू होती. संचालक सचिन पाटील हे निवड सभेला गैरहजर होते.फोटो ओळ :नूतन सभापती प्रफुल्ल पाटील यांचा सत्कार करताना आमदार स्मिता वाघ, माजी आ. साहेबराव पाटील, माजी सभापती उदय वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम आहिरे, उपसभापती अॅड.एस.एस बह्मे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, महेंद्र बोरसे आदी.
अमळनेर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 9:00 PM