शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

"महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून...'; अमित शाह यांच्याकडून पहिल्याच सभेत पवारांवर शाब्दिक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 6:32 PM

अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे.

BJP Amit Shah ( Marathi News ) : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगाव येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा हिशेब मागितला जातो. पण मी शरद पवार यांना सांगू इच्छितो की, मोदी हे पंतप्रधान होऊन १० वर्ष झाली आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे. तुम्ही त्या ५० वर्षांचा सोडा, मात्र फक्त पाच वर्षांचा तरी हिशेब जनतेला द्या," अशा शब्दांत अमित शाह यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गट भाजपसोबत सत्तेत गेला असला तरी पक्षाचे संस्थापक शरद पवार हे मात्र विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे भाजपचे केंद्रातील नेते महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. अशातच अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकताना आपल्या पहिल्याच सभेत पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसंच घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फटकारलं आहे.

जळगावच्या सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, "ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत. हे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का? काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आपला मुलगा आदित्य ठाकरेना मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे, ममता बॅनर्जींना आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. मग या सगळ्या नेत्यांपैकी तुमच्यासाठी कोण आहे? तुमच्यासाठी कोणी असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत," असं अमित शाह म्हणाले.

महाविकास आघाडीची उडवली खिल्ली

महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसमोर लोकसभा निवडणुकीत आव्हान उभं केलं आहे. या महाविकास आघाडीवर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले की, "राज्यात ३ चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिचे तिन्ही टायर पंक्चर झाले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. १ लाख मुलं डॉक्टर बनतील. आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोहचवण्यासाठी भाजपला साथ द्या," असं आवाहन शाह यांनी उपस्थित नागरिकांना केलं आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहJalgaonजळगावSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस