जळगाव : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ मतदारसंघापैकी सात मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले खरे मात्र यात केवळ चारच ठिकाणी भाजपला यश मिळविता आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा या वेळी दोन जागा भाजपने गमावल्या. यात मुक्ताईनगरात शिवसेना पदाधिकाऱ्याची बंडखोरी व त्यांना राष्ट्रवादीचा मिळालेला पाठिंबा या मुळे मते एकीकडे वळले व ‘नोटा’ची मतेही मोठी कारणीभूत ठरले. दुसरीकडे अमळनेरात तर गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराला या वेळी भाजपने उमेदवारी दिली तरी मतदारांनी त्यांना नाकारले.२०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने भाजप-शिवसेना स्वतंत्र्यपणे लढले होते. त्या मुळे भाजपने सर्वच्या सर्व ११ जागांवर उमेदवार दिले होते. त्या वेळी पक्षाला जळगाव शहर, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, रावेर, चाळीसगाव येथे विजय मिळविता आला होता. या वेळी युती होऊन सात जागी भाजपने उमेदवारी दिली. यात जळगाव शहर, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव या जागांवर विजय मिळविता आला. मात्र मुक्ताईनगर व रावेरची जागा गमवावी लागली. सोबतच २०१४मध्ये अमळनेर मतदार संघ ताब्यात घेता न आलेल्या भाजपला या वेळीही तो गमवावा लागला. विशेष म्हणजे गेल्या वेळी तेथे अपक्ष म्हणून निवडून आलेले शिरीष चौधरी यांना भाजपने उमेदवारी दिली. तरीदेखील मतदारांनी भाजपला नाकारले.मुक्ताईनगरात भाजप एकाकीअख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला मुक्ताईनगर मतदार संघ भाजपने ४० वर्षानंतर गमावला. या वेळी तेथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांंना उमेदवारी दिली. मात्र तेथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करीत युती असतानाही भाजपच्याच उमेदवाला आव्हान दिले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनीही माघार घेतल्याने भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र निर्माण झाले. असे असले तरी मतमोजणी दरम्यान सकाळपासूनच अॅड. खडसे व पाटील यांच्या मताधिक्यात चुरस दिसून आली. ही चुरस शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. एकूण मताधिक्य पाहता अॅड. खडसे यांचा १९५७ मतांनी पराभव झाला. मतदानादरम्यान १ हजार ८०६ मते ‘नोटा’ला गेले. त्यामुळे हे मतेदेखील चर्चेचे ठरत आहेत.पाचोºयातही चुरसपाचोरा मतदार संघात शिवसेनेचे किशोर पाटील व भाजप पदाधिकारी अमोल शिंदे यांच्यातही मोठी चुरस दिसून आली. दोघांचेही मताधिक्य खाली-वर होत राहिले.
जळगाव जिल्ह्यात भाजपने गमावल्या दोन जागा, मु्क्ताईनगरात शिवसेनेच्या बंजखोरीने धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:00 PM