शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

"खडसेंना जर खोटं बोलणं मोजण्याच्या मशिनीसमोर बसविलं तर मशिनही बंद पडेल"

By ajay.patil | Published: August 02, 2022 7:52 PM

आमदार मंगेश चव्हाण यांचा टोला

अजय पाटील, जळगाव: जिल्हा दूध उत्पादक संघाचा खडसे परिवाराने स्वत:ची प्रॉपर्टी म्हणून वापर केला असून, त्यांच्या कार्यकाळात दूध संघ पुर्णपणे राजकीय अड्डा करण्यात आला. आता त्यांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराचा पिक्चर आम्ही टप्प्याटप्प्याने दाखवणार. या पिक्चरनंतर खडसे परिवाराला पळता भुई थोडी होणार असल्याचा गौप्यस्फोट जिल्हा दूध संघाचे मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. दूध संघात मंगळवारी संचालक मंडळाने बैठक घेतल्यानंतर मुख्य प्रशासक म्हणून मंगेश चव्हाण यांनी ही बैठक संपल्यानंतर प्रशासक मंडळाच्या सदस्यांसोबत चर्चा केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी, खडसेंना जर खोटं बोलण्याचं मोजणी करणाऱ्या मशिनीसमोर बसविले तर मशिनही बंद पडेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

खडसे परिवाराकडून दूध संघाचा स्वत:ची प्रॉपर्टी म्हणून वापर झाल्याचा आरोप

"दूध संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असून, तो भ्रष्ट्राचार  आम्ही बाहेर काढणार आहोत. मंदाकिनी खडसे यांनी नियमानुसार व आपली नैतिकता दाखवून वर्षभरापुर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी ती नैतिकता दाखवली नाही, त्यांनी याआधी अनेकवेळा पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राजीनामा दिलाच नाही. आम्ही शासनाच्या आदेशानुसारच दूध संघाचा पदभार घेतला असून, आम्हाला या प्रकरणात कोणताही संभ्रम नसून, आम्ही नियमात व न्यायालयाच्या आदेशानुसारच कारभार करणार", असे मंगेश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी दूध संघाचे प्रशासक मंडळातील सदस्य अरविंद देशमुख, अजय बढे हे देखील उपस्थित होते.

खोटं बोलण्याचं मोजणी करणाऱ्या मशिनीसमोर बसविले तर मशिनही बंद पडेल!

"एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. 'खोटं बोल मात्र ते रेटून बोल' अशीच पद्धत त्यांची आहे. त्यांना जर खोटं बोलणं मोजणी करणाऱ्या मशिनसमोर बसविले तर ते मशिन देखील बंद पडेल", असा टोला मंगेश चव्हाण यांनी खडसेंना लगावला. "आम्ही नियमानुसार कार्यकारी संचालकांकडून पदभार घेतला असून, सहकारी संस्थाचे नाशिक विभागीय उपनिबंधक सुरेंद्र तांबे यांच्या आदेशानुसारच पदभार घेतला असल्याने बेकायदेशीर म्हणण्याचा संबंध येत नाही", असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाJalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव