जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटच्या गाळेधारकांवर थकीत भाड्यापोटी मनपाने लावलेल्या ५ पट दंड रद्दच्या निर्णयावरून भाजपाने पुन्हा घुमजाव केल’ आहे. २१ रोजी होणाऱ्या महासभेच्या अजेंडामध्ये हा विषय घेण्यात आला नसून, काही नगरसेवकांनी हा विषय महासभेत घेतला तर त्यादिवशी गैरहजर राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपाने पुन्हा पिछेहाट घेतल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.भाजपाने निवडणुकीच्या काळात गाळेधारकांना ५ पट दंड रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मनपात सत्ता येवून पाच महिने होवून देखील सत्ताधाºयांना गाळेधारकांवर मनपाने लावलेला ५ पट दंड रद्द करता आलेला नाही.नगरसेवकांमधील भिती दुर करण्यास आमदारांना अपयश५ पट दंड रद्द केला तर न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याचा मुद्यावरून नगरसेवकांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप होवू शकतो. त्यामुळे नगरसेवक अडचणीत येवू शकतात अशी भिती नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळेच हा विषय मार्गी लागू शकलेला नाही. आमदार सुरेश भोळे यांनी प्रत्येक नगरसेवकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरी ही भिती नगरसेवकांच्या मनातून निघू शकलेली नाही. दरम्यान, या प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील अनेकवेळा समजूत घालून देखील नगरसेवक या ठरावाच्या विरोधात आहे.वकीलांचा घेतला जातोय सल्ला...५ पट दंड रद्द क रून त्या जागेवर १ पट दंडचा निर्णय घेण्यात येणार होता. यासाठी काही नगरसेवकांनी खासगीत विधी तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतला. यामध्ये नगरसेवक अडचणीत येवू शकतात असा सल्ला विधी तज्ज्ञांनी दिल्यामुळे २० पेक्षा अधिक नगरसेवकांनी महासभेत गैरहजर राहण्याचा इशारा दिला असल्याने हा विषय या महासभेत न घेण्याचा विषय रद्द करण्यात आला आहे. महासभेत उपस्थित राहण्यासाठी भाजपाकडून व्हिप देखील काढण्यात येणार होता. मात्र, यामुळे पक्षात फुट पडण्याची शक्यता असल्याने गाळेधारकांना दिलासा देण्यासाठी इतर उपाय योजना करण्याच्या हालचाली सत्ताधाºयांकडून सुरु झाल्या आहेत.५ पट दंड रद्दबाबत नगरसेवकांशी चर्चा झाली असून, गाळेधारकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नगरसेवकांमध्ये कोणतीही भिती नाही, कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून सर्व हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. या महासभेतच हा निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहिल.-भगत बालानी, मनपा गटनेते, भाजपा
५ पट दंड रद्दच्या विषयात भाजपाची पुन्हा पिछेहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:20 AM
नगरसेवकांचा रजेचा इशारा
ठळक मुद्दे अजेंड्यातही विषय नाहीच