जळगाव : राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे प्रश्न सुटत नसल्याने राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांना शेजारी राज्यांचे आकर्षण वाढीस लागले आहे. राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरीत महाराष्टÑ असे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याने शासन हेतूपूर्वकच हे प्रश्न सोडवत नाही की काय, अशी शंका येत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे सांगितले.पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्याला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील शेतकऱ्यांना त्या राज्याकडून १ लाख हेक्टरी मदत दिली जाते. अनेक प्रश्नांबाबत राज्यांच्या सिमेला लागून असलेल्या महाराष्टÑातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेजारच्या राज्याशी तुलना आता होऊ लागली असून शेजारच्या राज्यात जायचे का? असा विचारया जिल्ह्यांमधून व्हायला लागला आहे. एकेकाळी महाराष्टÑ प्रगतहोता. इतर राज्य आपले अनुकरण करत होते.आता दुर्देवाने आपल्याला इतर राज्यांच्या योजना किती चांगल्या आहेत? त्यांचे अनुकरण करावेसे वाटत आहे. राज्याचे त्रिभाजन करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही ते होऊ देणार नाही.
राज्याचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न - चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:40 AM