जळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे रक्तदान करणा-यांची संख्या घटली असून त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी भाजपातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्याशिवाय कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय भाजपा महानगरच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला.
प्रदेश संघटन मंत्री रवी अनासपुरे, खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन बैठक घेण्यात आली. कोरोना महामारीमुळे रक्तदानाचा पुरवठा कमी होत त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करणे, कोरोना लसीकरण,जनजागृती, कोरोना चाचणी शिबिर आदी उपक्रम आगामी काळात राबविण्यात येणार आहे. आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले सर्व बुथ व शक्ती क्रेद प्रमुख यांनी भाजपाच्या घोषवाक्या प्रमाणे "मेरा बुथ सबसे मजबुत'' या प्रमाणे आता ''आपला बुथ कोरोना मुक्त'' असा संकल्प करावा असे आवाहन केले. महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले समारोप केला. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस महेश जोशी यांनी केले. या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, विधान सभा प्रमुख दीपक सारखे, मनोज भांडारकर, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, किसन मराठे, केदार देशपांडे, अजित राणे, संजय लुला, विनोद मराठे, नीलेश कुलकर्णी व अमित साळुंखे उपस्थित होते. आभार नितीन इंगळे यांनी मानले.