जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे व वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा भोंगळ कारभार व आरोग्य विभागाकडून नागरिकांचे होणारे हाल व दिशाभूल, रुग्णांची हेळसांड, आर्थिक लूट यावर मात करण्याकरता भारतीय जनता पार्टीची कोरोना योद्धा म्हणून एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे या वेळी ठरविण्यात आले. या समितीत महानगरातील ९ मंडळाची मंडळनिहाय २० कार्यकर्त्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीतर्फे नागरिकांना लागणारी कोरोना सेंटर, त्यांचे संपर्क क्रमांक, सेंटर्समध्ये उपलब्ध बेडची माहिती, ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींची माहिती पुरवण्यात येणार आहे. सोशल मीडियाचे अक्षय चौधरी यांनी बैठकीचे नियोजन केल्याचे प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी सांगितले.
भाजप कोरोना योद्धा समिती स्थापन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:15 AM