मिलिंद कुळकर्णीलोकसभा निवडणुकीला भाजपाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘शतप्रतिशत’चा नारा लावणाऱ्या भाजपाने चक्क विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेबरोबर जागावाटप केले आहे. राष्टÑीय लोकशाही आघाडीचे महत्त्व भाजपाला चार वर्षांनी पुन्हा उमजले आहे, कारण लोकसभा निवडणूक वर्षभरावर आली आहे. जळगावात शिवसेना किंवा सेनेशी निगडीत खान्देश विकास आघाडीशी जुळवून घेण्याकडे काही भाजपा नेत्यांचा कल आहे, त्याला ही पार्श्वभूमी आहे.जळगाव, धुळे या महापालिकांच्या निवडणुका या वर्षी अनुक्रमे सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यात होत आहे. दोन्ही पालिकांमध्ये भाजपा विरोधकांची सत्ता आहे. दोन्ही पालिकांमध्ये भाजपाने एकदा सर्वोच्च स्थान पटकावलेले आहे. महापालिका क्षेत्र हाच शहर विधानसभा मतदारसंघ असून आणि त्यावर भाजपाचे वर्चस्व आहे. केंद्र व राज्यात सत्तास्थानी असल्याने या दोन्ही पालिकांमध्ये कमळ फुलविण्याची ही सगळ्यात चांगली वेळ असल्याची भाजपा कार्यकर्त्यांची मनोभूमिका आहे.हे चित्र खूप आशादायी आहे. मात्र वास्तविक स्थिती, बदललेला काळ, राजकीय समीकरणे वेगळी आहेत. त्याकडे कानाडोळा करुन आगामी निवडणुकांचा वेध घेता येणार नाही..जळगावात सुरेशदादा जैन यांच्या आघाडीची सत्ता महापालिकेत आहे. गेल्या ३० वर्षांपासून जैन यांचे एकहाती वर्चस्व पालिकेत आहे. नगरसेवक, सभापती, नगराध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे आमदार अशा पध्दतीने पदे देत त्यांनी कार्यकर्त्यांची जडणघडण केली आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करीत सहा महिन्यांचे नगराध्यक्ष, महापौरपद अनेक नगरसेवकांना देऊन नेतृत्वाची संधी दिली आहे. मजबूत संघटन, जनसंपर्क, सामाजिक कार्य याद्वारे खान्देश विकास आघाडीच्या या नगरसेवकांचा वॉर्डात दबदबा आहे. २००१ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप रायसोयी हे पराभूत तर भाजपाचे उमेदवार डॉ.के.डी.पाटील हे विजयी झाले होते. मात्र सभागृहात आघाडीचे बहुमत होते. म्हणजे सर्वाधिक नगरसेवक जैन यांच्या आघाडीचे निवडून आले होते. त्यावेळी एकनाथराव खडसे हेच भाजपाचे निवडणुकीचे सूत्रधार होते. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सुरेश भोळे विजयी झाले. शिवसेनेचे उमेदवार आणि या मतदारसंघाचे तब्बल ९ वेळा नेतृत्व करणारे सुरेशदादा जैन हे पराभूत झाले. जैन हे त्या काळात घरकूल प्रकरणी कारागृहात होते आणि लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली मोदी लाट सहा महिन्यानंतरही कायम होती, हे त्यामागील कारण होते. कारण जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार निवडून आले होते. अशी कामगिरी स्थापनेनंतरच्या ३५ वर्षांत केवळ दुसºयांदा भाजपा करु शकलेला आहे.२००१ ची पालिका निवडणूक आणि २०१४ ची विधानसभा निवडणूक वगळता भाजपाला जळगाव शहरात घवघवीत यश मिळालेले नाही. २०१३ च्या महापालिका निवडणुकीत प्रथमच भाजपा नगरसेवकांची संख्या दोन आकडी झाली आहे.तिकडे धुळ्यात राष्टÑवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे महापालिकेत वर्चस्व आहे. त्यांना आव्हान देणारा भाजपा मात्र दोन गटांमध्ये विभागलेला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश करुन अनिल गोटे यांनी आमदारकीची हॅटट्रिक साधली. यापूर्वी ते अपक्ष म्हणून निवडून येत असत. त्यांच्या पत्नी हेमा गोटे या लोकनियुक्त नगराध्यक्षा होत्या आणि पालिकेत लोकसंग्रामचे वर्चस्व होते. मात्र गेल्या निवडणुकीत सर्व महिला उमेदवार उभ्या करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि केवळ एक उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे पालिका राजकारणाचा अनुभव असलेले गोटे महापालिका निवडणुकीची रणनिती आखत आहेच. भाजपाचा दुसरा गट केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा आहे. या गटाने अलिकडे महापालिकेत स्थायी समितीत भाजपाचे बहुमत नसतानाही स्थायी समिती सभापतीपदी बालीबेन मंडोरा या भाजपा नगरसेविकेला निवडून आणले. त्यांच्या या कृतीने पाच वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला. रावल यांनी मंजुळा गावीत यांना असेच महापौरपदी निवडून आणले होते.भाजपा नेतृत्वापुढे पेच असा आहे की, जळगाव आणि धुळे महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कुणाकडे द्यायचे? जळगावात एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार व महानगराध्यक्ष सुरेश भोळे, विधान परिषदेचे सदस्य व जळगाव निवासी स्मिता वाघ व चंदूलाल पटेल तर धुळ्यात डॉ.सुभाष भामरे, जयकुमार रावल, अनिल गोटे हे नेतृत्वाचे दावेदार आहेत.जळगावात सुरेशदादा जैन यांनी युतीचा प्रस्ताव भाजपापुढे ठेवला आहे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने सोमवारी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा होणार आहे. प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी खडसे यांची घेतलेली भेट आणि जळगावात घेतलेल्या बैठकीला या भेटीची पार्श्वभूमी असू शकते. धुळ्यात भाजपाच्या दोन गटांची मोट बांधण्यात नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक विजयराव पुराणिक यांच्याकडे भाजपाच्या प्रदेश संघटनमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. भुसारी यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली. पुराणिक यांनी या आठवड्यात एकनाथराव खडसे यांची मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दोन दिवसांनंतर त्यांनी जळगावात येत ग्रामीण आणि महानगर शाखेच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. लोकसभा, विधान परिषद निवडणुकीचा विषय असला तरी महापालिकेची चाचपणी त्यांनी केलीच.पूर्वेतिहास...भाजपाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरातून भरघोस मते मिळविल्याचा आधार पकडून ५० प्लसचे उद्दिष्टय सहज साध्य होईल, म्हणून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला जात आहे. २००१ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले असले तरी सर्वाधिक नगरसेवक जैन यांचे निवडून आले होते. याकडे कानाडोळा होत आहे.
मनपा निवडणुकीविषयी भाजपाचा सावध पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 12:25 PM