जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जळगाव : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तहसीलदार (महसूल) पंकज लोखंडे, अव्वल कारकून देवेंद्र कोळी, आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.
वीज दर सवलत अर्ज नोंदणीस मुदतवाढ
जळगाव : वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यास आता २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित यंत्रमाग घटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.