पारोळा : पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दोन महिलांना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या बोळे ता.पारोळा येथील वॉटरमन ज्ञानेश्वर आनंदसिंग गिरासे ( ४०) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वॉटरमन ज्ञानेश्वर गिरासे व सचिन पाटील हे महिलेच्या पतीला बाहेर पार्टीला घेऊन जात होते.
या संधीचा फायदा घेत तो महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करीत होता. महिलेने नकार दिला असता पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. पतीला दारूच्या नशेत ठेन महिलेशी त्याने शारीरिक संबंध ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.यानंतर या महिलेची मैत्रीण आरोपीस समजावण्यास गेली असता त्याने तिचे बोलणे रेकार्ड करीत तिच्याकडेच शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता पतीला सांगण्याची धमकी देत बळजबरी केली. दोन्ही महिलांनी याबाबत फिर्यादी दिली. त्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.