लोकमत ऑनलाईन जामनेर, दि.29 : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे दुस:याला जीवनदान देणे शक्य आहे. अनेकांचे प्राण त्यामुळे वाचू शकतात. म्हणून रक्तदान करणे ही आजच्या काळाची गरज आहे . आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त तालुका भाजपा युवा मोर्चातर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी 204 जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले. मंत्री महाजन पुढे म्हणाले की, देणारा माणूस केव्हाही महान असतो. दानाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. रक्तदानासारखे दुसरे पुण्य कुठलेही नाही. या वेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमर पाटील, महेंद्र बाविस्कर, चंद्रकांत बाविस्कर, जितू पाटील, आतिश झाल्टे, अॅड. शिवाजी सोनार, श्रीराम महाजन, पं.स. सभापती संगीता पिठोडे, जे.के.चव्हाण, तुकाराम निकम, विलास पाटील, नवल पाटील, प्रा.शरद पाटील, छगन झाल्टे, अॅड.सीतेश साठे, अण्णा पिठोडे, रवींद्र झाल्टे, डॉ.प्रशांत भोंडे, वैद्यकीय अधीक्षक विनय सोनवणे, डॉ.आर. के. पाटील, डॉ.जयश्री पाटील, डॉ.वैशाली चांदा , कमलाकर पाटील, दीपक तायडे, सुभाष पवार, डॉ.संजीव पाटील, डॉ.अरविंद बोडेकर, अॅड.अनिल सारस्वत, हर्षल चौधरी, विजय शिरसाठ, अलियार खान, खलील खान, रहीम ठेकेदार, नसिम शेख आदी उपस्थित होते.
जामनेर येथे 204 जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 6:30 PM
रक्तदान करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी येथे आयोजीत शिबिरात केले.
ठळक मुद्देतालुका भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादपं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीवर्षानिमित्त उपक्रम