भडगाव : लोकमत व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत नातं रक्तांचं’ या
उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. यात ७५ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, पाचोरा येथील आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थिती दिली.
भडगाव पंचायत समितीत झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप वाघ होते. या
रक्तदान शिबिरात नागरिक, सैनिक, शिक्षक, तरुण, मुली, महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शशिकांत
येवले, डॉ.विशाल पाटील, जि.प. सदस्य डॉ.कर्तारसिंग परदेशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ता खलील देशमुख, लिलावती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रमोद पाटील, नायब तहसीलदार रमेश देवकर, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव, गोदावरी मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ.नितीन सोनवणे, बाजार समितीचे प्रशासक संचालक युवराज पाटील, माजी संचालक राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, बाजार समितीचे प्रशासक संचालक रणजीत पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, शिवसेना शहर प्रमुख योगेश गंजे, माजी नगरसेविका योजना पाटील, साई ऑटोचे संचालक रावसाहेब पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस देवा महाजन, पाचोरा तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.राजेंद्र परदेशी, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, राजेंद्र ठाकरे, ठेकेदार संभाजी पाटील, पत्रकार जावेद शेख, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पीपल्स बँकेचे संचालक डी.डी. पाटील, सोनू शेख, प्रहार एरंडोल तालुकाध्यक्ष सुनील पाटील, एरंडोल आरपीआय अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, वाडे येथील माजी उपसरंपच उषा परदेशी आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्तविक ‘लोकमत’चे वार्ताहर अशोक परदेशी यांनी केले, तर सूत्रसंचालन बाळू जडे यांनी केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले. जळगाव गोदावरी रक्तपेढीच्या टीमने सहकार्य केले.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, लोकमतने नेहमीच पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलीप वाघ यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. रविवारच्या शिबिरात अश्विनी निंबाजीराव सोमवंशी, ज्ञानेश्वरी सुनील जावरे, प्रणाली सर्जेराव भोसले, नम्रता प्रशांत पाटील या युवतींनी, तसेच करुणा प्रमोद पाटील या महिलेनेही रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात नागरीक, सैनिक, शिक्षक, तरुणांप्रमाणे मुली, महिलांनीही रक्तदान मोहिमात सहभाग घेतला. गोंडगाव येथील रहिवासी सुभाष साळुंखे व वीरेंद्र सुभाष साळुंखे या सैनिक बंधुंनीही रक्तदानात सहभाग घेतला.
फोटो : भडगाव येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना आमदार किशोर पाटील. सोबत दिलीप वाघ, विजयकुमार भोसले, अशोक परदेशी आदी.