जळगाव : अयोध्या नगरातील हनुमान मंदिरात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रक्तदात्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुचित्रा महाजन, पंकज नाले,दीपक दाभाडे,डॉ. भूषण क्षत्रिय, भारत राजपूत,मुकाश सोनवणे यांनी केले आहे.
बोरिंग एजंटची बैठक
जळगाव : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे बोरिंग करून देण्याचे दर हे मशिन मालकांच्या अवाक्याच्या बाहेर जात आहेत. गेल्या ८ ते १० दिवसांपासून बोअरवेल व्यावसायिकांनी मागील ८ ते १० दिवसांपासून बोअरींग गाड्या बंद आहेत. एक फेब्रुवारीपासून नवीन दराप्रमाणे व्यवसाय पूर्ववत सुरू करावा, असे बोअरवेल व्यावसायिकांच्या जळगाव जिल्हा रिंग ओनर्स व बोरिंग एजंट असोसिएशनने ठरवले आहे.
अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी
जळगाव : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज मंदिर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा जळगाव शहरात उभारण्याची मागणी मांग वर मातंग समाज जोडणारे सामाजिक संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष कलाबाई शिरसाठ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.