निंभोरा बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव :येथील युवा रसिक मंडळातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून झालेल्या या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले.यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, डॉ.एस.डी.चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील, सोपान पाटील, नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन सुधीर मोरे आदीनी दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरूवात केली.यावेळी सोशल डिस्टसिंगचे पालन करीत शिबिर पार पडले. यावेळी ४९ पुरुष व एका महिलेने रक्तदान केले.विशेष म्हणजे १८ वर्षाच्या खालील मुलांनीही यात सहभाग नोंदविण्याचा आग्रह केला. मात्र १८ वर्षावरील व्यक्तीलाच रक्तदान करता येत असल्याने त्यांचा हिरमोड झाला. मात्र बाकी तरुणांनी उत्साहात रक्तदान केले.इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे डॉ.ए.एम.चौधरी, वीरेंद्र बिऱ्हाडे, उमाकांत शिंपी, योगेश पाटील, अन्वर शेख यांच्यासह निंभोरा येथील डॉ.जयेश वाणी, डॉ.डी.एस. झोपे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वितेसाठी धीरज भंगाळे, दुर्गादास पाटील, नंदपालचे चेअरमन सुधीर मोरे, सुनील कोंडे, रवींद्र भोगे, प्रा.दिलीप सोनवणे, गुणवंत भंगाळे, सोपान पाटील, परमानंद शेलोडे, हर्षल ठाकरे, युगल राणे, राजीव भोगे आदींनी परिश्रम घेतले.
निंभोरा येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:03 PM
निंभोरा येथे रक्तदान शिबिर झाले.
ठळक मुद्दे५० जणांनी केले रक्तदानयुवा रसिक मंडळाचा उपक्रम