यावल : विवाहितेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून धनराज त्र्यंबक सपकाळे (वय 45, रा. अंजाळे, ता. यावल) यांचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी मध्यरात्री अंजाळे शिवारातील मोर नदीवरील पुलाजवळ उघडकीस आली. याप्रकरणी तीन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनुसार, विजय त्र्यंबक सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ मयत धनराज सपकाळे हा बुधवारी त्यांच्या शेतात ट्रॅक्टर (एमएच-19-एए-7028) वरून शेतातील शेत तळ्याची माती नागरणीचे काम करीत होता. तो रात्री 11 वाजेपावेतो घरी परतला नाही. त्याची प}ी संगीता सपकाळे यांनी धनराज परतला नाही व मोबाइलदेखील उचलत नाही, असे सांगितले. तेव्हा विजय सपकाळे स्वत: त्यांचा शोध घेतला असता रात्री 11.30 वाजेच्या सुमारास गावातील संशयित पंढरीनाथ तुळशीराम सपकाळे, पप्पू भास्कर सपकाळे व अन्य एक अनोळखी असे तिघे एका दुचाकीवर जोरात जाताना दिसले व पुढे पुलावरच कपाळास जबर दुखापत होऊन मृतावस्थेत धनराज आढळून आला. या तिघांनीच धनराज याची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करीत गुरुवारी यावल पोलिसात तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी करीत आहे. गुरुवारी यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. कौस्तुभ तळेले यांनी शवविच्छेदन केले. (वार्ताहर)
प्रेमसंबंधाच्या संशयावरून खून
By admin | Published: February 03, 2017 12:57 AM