शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मतदार यादीच्या आॅनलाईन कामात सर्व्हरचा खोडा असल्याच्या बीएलओंनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 8:05 PM

आॅनलाईनच काम करण्याच्या सक्तीमुळे अडचण

ठळक मुद्दे जळगाव तालुक्याची आढावा बैठकजि.प. शिक्षण समिती सदस्यांविरूद्ध अपात्रतेची कारवाईकाम न करणाºया कर्मचाºयांवर गुन्हे

जळगाव: मतदार यादीचे काम आॅनलाईन किंवा आॅफलाईन करण्याचा असलेला पर्याय रद्द करत सर्व बीएलओंना (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) आॅनलाईनच काम करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र आॅनलाईनच्या कामात सर्व्हर कनेक्ट न होण्यासह अनेक अडचणी उभ्या ठाकल्याने अडचणीत भर पडली आहे. शुक्रवारी जळगाव तालुक्यातील बीएलओंच्या झालेल्या आढावा बैठकीत या तक्रारींचा पाढाच तहसिलदारांसमोर वाचण्यात आला. त्यापैकी काही समस्यांवर लगेचच तोडगा काढण्यात आला असून काही अडचणींवर लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. तसेच आतापर्यंत ज्यांनी काम सुरूच केलेले नाही, अशा बीएलओंवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. भारत निवडणूक आयोगाने  १ जानेवारी,२०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या कार्यक्रमातंर्गत १५ नोव्हेबर ते ३० नोव्हेंबर, २०१७ या कालावधीत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी. मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. या कार्यक्रमात पुर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात नांव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना नमुना क्र.६ चे वाटप करणे व त्यांच्याकडून परत घेणे व जमा करणे. सन २०१८ च्या पुनरिक्षणासाठी पात्र नागरिकांना नमुना क्र. ६ चे वाटप करणे व त्यांच्याकडून परत घेणे व जमा करणे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीसाठी पात्र होणा-या नागरिकांची माहिती जमा करणे. स्थलांतरित व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमुना क्र.७ चे वाटप करणे व जमा करणे, इत्यादी महत्वाची कामे करण्यात येणार आहे.आढावा बैठकीत मांडल्या व्यथा१५ तारखेला या मोहीमेला सुरूवात झाली असल्याने शहरातील ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ७८ बीएलओंनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार दि.२४ रोजी तालुक्यातील बीएलओंची बैठक तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार रूपाली काळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात बीएलओंनी केवळ आॅनलाईनच काम करावयाचे असल्याने अडचणी जाणून घेण्यात आल्या. सर्व बीएलओंना यासाठी मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून देण्यात आले आहे. मात्र मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश व रेखांश गोळा करणे अथवा अक्षांश व रेखांशाचे एसएमएस करणे बंधनकारक आहे. बीएलओ एखाद्या मतदाराच्या घरी गेलेले असतानाच सर्व्हर कनेक्ट न झाल्यास त्यासाठी पुन्हा तेथे जावे लागणे अथवा वाट पाहण्यात वेळ वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. याखेरीजही तक्रारी आहेत. त्या बीएलओंनी बैठकीत मांडल्या. त्यातील काही समस्या सोडविण्यात आल्या असून काहींबाबत मार्गदर्शन मागवून त्या सोडविल्या जातील, असे तहसीलदारांनी सांगितले.जि.प. शिक्षण समिती सदस्यांविरूद्ध अपात्रतेची कारवाईमतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम हा राष्टÑीय कार्यक्रम असून त्यासाठी बीएलओ म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाºयांना त्यांच्या मूळ कामातून या कालावधीत मुक्त करण्यात यावे, असे आदेशच संबंधीत विभागांना दिले आहेत. असे असतानाही जि.प. शिक्षण समितीच्या सभेत शिक्षकांना बीएलओंची कामे देऊ नयेत असा ठराव करण्यात आला. तो पूर्णपणे बेकायदेशिर असून या राष्टÑीय कामात अडथळा आणणारा आहे. त्यामुळे हा ठराव करणाºया शिक्षण समिती सदस्यांवरच अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती तहसीलदार निकम यांनी दिली.काम न करणाºया कर्मचाºयांवर गुन्हेज्या कर्मचाºयांची बीएलओ म्हणून नियुक्ती होऊनही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले नसेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार निकम यांनी दिली.