शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘मराठी’पण सातत्याने जपणारे अमेरिकेतील असेही मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 4:16 PM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये अमोल जयंत सराफ यांनी सांगितलेल्या आठवणी.

अमेरिकेत जवळजवळ प्रत्येक मोठय़ा शहरात एक तरी मराठी मंडळ आहे. फ्लोरीडा स्टेटमधील टँपा बे येथील ही मंडळी मायबोली मेळावा या संस्थेमार्फत एक दुस:याबरोबर बांधली गेलेली आहेत. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे डिझाईन, सन्मानपत्र तयार करून देण्यासाठी जळगाव येथील कलाकार अमोल जयंत सराफ यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे. आपली काही मराठी मंडळी अमेरिकेत स्थायिक झालेली असली तरीही आपली भारतीय संस्कृती जपून आहेत. विशेष म्हणजे आपले सगळे भारतीय सण तेवढय़ाच किंबहुना आपल्यापेक्षा जास्त उत्साहाने साजरे करतात. यबोली मेळावा हे मंडळ गेल्या 17 वर्षापासून अमेरिकेतील टँपा बेमध्ये कार्यरत असून, वर्षभरात विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी कार्यक्रम राबवत आहे. या मंडळाचा मुख्य उद्देश हा आपली संस्कृती जोपासत अमेरिकन समुदाय आणि मराठी समुदाय यांच्यात सुसंवाद निर्माण करून सांस्कृतिक देवाण-घेवाण करून देणे हा आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे राबविल्या जाणा:या आदिवासी सहज शिक्षण परिवार या उपक्रमाला समर्थन आणि सहयोग ‘फीडिंग अमेरिका’ या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग आदी उपक्रमांमध्ये मायबोली मेळावा हे मंडळ सहभागी होत असते. डोंबिवलीत 1985 पासून बोडस सभागृहाचे मालक शरद बोडस यांच्या घरी पूर्वापार नवरात्रोत्सव साजरा केल जातो. त्यात देवीची सजावट व मुखवटा रंगविण्याची अथक सेवा मी व माझा मोठा भाऊ मोहन जयंत सराफ सातत्याने करीत आहे. मात्र 2016 मध्ये अमेरिकेत आलो. आता आपल्या हातून देवीची सेवा होणार नसल्याचे दु:ख मनात सलत होते. मात्र बोडस यांच्या मुलांनी टँपा बेमधील मित्रांचे मोबाइल नंबर देऊन त्यांना भेटण्यास सांगितले. मग मी राजेश सुंदर, स्वानंद गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. पुढे संदीप रणदिवे अशा एकेक मित्राशी संपर्क होत पुढे संपर्क वाढत गेले. परदेशात आपल्या मातीतला माणूस भेटल्याचा आनंद वेगळाच. संदीप हा महाराष्ट्र मायबोली मंडळाचा सचिव असल्याचे समजल्यावर त्याने बैठकीला बोलविले अन् मी व प}ी अल्पना सैनी-सराफ बैठकीला गेलो. खूप गप्पा झाल्या. माङयातला कलाकार पाहून सगळे भारावले. यानंतर दिवाळी उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्याचे व्यासपीठ मी तयार केले. त्याने सर्व प्रभावित झाले. पुढे समीर कुलकर्णी, ऋषिकेश देशपांडे, प्राजक्ता देशपांडे, संध्या पालखे, राधारमण कीर्तने अशा पाच जणांनी कविता, काही मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या. दिवाळीला मंडळाची कार्यकारिणी बदलते. तेव्हा गेल्या दिवाळीला कल्चरल सेक्रेटरी म्हणून पत्नी अल्पनाची निवड झाली. पुढे मी महाराष्ट्र मंडळाचा नवीन सिम्बॉल व लोगो तयार केला. येथे आम्ही गुढीपाडवा साजरा केला. येथे होळीसुद्धा साजरी करतात. पण पूर्णपणे कोरडय़ा रंगांसोबत. गेल्या 11 वर्षापासून ‘अभिरुची’ हा दिवाळी अंक निघतो. याच्या मुखपृष्ठाचे डिझाईन तयार करण्याचा मान मला मिळाला. या वर्षापासून ‘मायबोली समर्पण पुरस्कार’ देण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्र मंडळासाठी आपला अमूल्य वेळ देऊन झटणा:या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षाचे मानकरी ठरले ते दयाघन पेंढारकर व अतुल तायवडे. यांना देण्यात आलेले सन्मानपत्र मी तयार केले. एकंदरीत, अमेरिकेत स्थायिक झालेले मराठी नागरिक विविध उपक्रम उत्साहाने साजरे करतात, ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.