शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

रशियात बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले, अमळनेरच्या भाऊ-बहिणीला शोधण्यात ‘माॅस्को’च्या पथकाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 7:56 AM

Jalgaon News: रशिया देशातील यारोस्लाव-द-वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.

जळगाव रशिया देशातील यारोस्लाव-द-वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात बुडालेल्या पाचपैकी एक विद्यार्थिनी बचावली असून, भडगावच्या एकाचा तर अमळनेरच्या भाऊ-बहिणीचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी तातडीने पृर्तता केली जात असल्याची माहिती तेथील दूतावासातील अधिकारी कुमार गौरव यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शनिवारी सकाळी कळविली.

मंगळवारी रात्री वोल्खोव्ह नदीच्या  प्रवाहात पाच जण बुडाले होते. त्यात जळगावच्या हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) तिघांसह मलिक गुलामगोलस मोहम्मद याकूब (२०, मुंबई) व निशा भूपेश सोनवणे (२०, धुळे, हल्ली रा. पुणे) यांचा समावेश होता. निशा काही तासांतच बेशुद्ध अवस्थेत हाती लागली होती. ती शुद्धीवर आली असताना घटनेच्या दुसऱ्यादिवशी हर्षलचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले होते. जिशान व जिया या भाऊ-बहिणीचे मृतदेह शनिवारी हाती लागले. 

दूतावासाकडून पाठपुरावाआंतरराष्ट्रीय संहिता पार पाडल्यानंतर मृतदेह भारतात आणण्यासाठी परवानगी मिळणार आहे. त्यामुळे कुमार गौरव व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद केंद्रीय पातळीवर ही संहिता तातडीने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. भारताचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांसह विद्यापीठासोबत समन्वयासह अन्य प्रक्रिया पूर्ण करीत असल्याचे दूतावास कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJalgaonजळगावrussiaरशियाStudentविद्यार्थी