गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : लॉकडाऊननंतर तालुक्यातील दोन हजार २३५ शेतकऱ्यांनी कापूस नोंदणीसाठी नावे नोंदवली आहेत. बोदवड बाजार समिती अंतर्गत येणाºया उपबाजार समिती मुक्ताईनगर येथे ९७६, वरणगाव येथे १९८ अशी एकूण तीन हजार ४०९ शेतकºयांनी कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. त्यात आजपावेतो एकूण १० हजार १७१ क्विंटल कापूस खरेदी केंद्राने खरेदी केला आहे. नोंदणीच्या ३० टक्केही कापूस खरेदी नाहीबोदवड येथील स्टेशन रोडला तसेच दुसरीही जिनिग स्टेशन रोडला केंद्राच्या कापूस खरेदी केंद्राने खासगी जिनिंगवर खरेदी करत आहे. त्यात आजपावेतो ३९० वाहने मोजणीसाठी सोडण्यात आली आहेत. त्यात बोदवडची २७७, मुक्ताईनगर ८२ आणि वरणगावची ३१ अशी वाहने आहेत. सदर दोन ठिकाणी कापूस जात आहे पण त्याची प्रतवारी ठरवण्यासाठी एकच ग्रेडर आहे. त्याचप्रमाणे याच ग्रेडरकडे रावेर तालुक्याचाही अतिरिक्त पदभार आहे.ग्रेडर गणेश कºहाडे हे असून, चांगल्या प्रतीचा कापूस आल्यास भाव पाच हजार ३५५ रुपये लावत असल्याचे सांगितले. मोजणी झालेल्या कापसाला या जिनिंगमध्ये प्रेसिंग करून गठाणी तयार केल्या जात असून, आजपावेतो एका जिनिंगला ११००, तर दुसºया जिनिंगला ७५२ अशा एकूण १,८५२ गठाणी तयार केल्या आहेत.गठाणीसाठी जागा पडत आहे अपूर्णमुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव या तिन्ही ठिकाणच्या कापसाच्या गठाणी बोदवडलाच तयार होत असल्याने या गठाणी ठेवण्यासाठी जागा अपूर्ण पडत आहे. ताब्यात असलेल्या गोदामापर्यंत वाहतूक करण्यासाठी मजूर वर्गही कमी पडत आहे. तापमान वाढीमुळे जिनिंगचालकांना धोका पत्करून जिनिंग चालू ठेवावी लागत आहे. त्यात अजून नोंदणीच्या ३० टक्के कापूसही मोजला गेलेला नाही.मोताळ्याच्या शेतकºयानेही केली होती नोंदणीबोदवड येथील कापूस विक्रीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेतकºयांनी नोंदणी केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या शेतकºयास यादीतून वगळण्यात आले.बाजार समितीच्या आवारातून नोंदणीप्रमाणे वाहन सोडत आहे. तसे टोकन शेतकºयांना दिले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाप्रमाणे शेतकºयांच्या पाहणीसाठी यादी वाचन सुरू आहे.-विशाल चौधरी, प्रभारी सचिव, बाजार समिती, बोदवड
बोदवडला नोंदणीच्या ३० टक्केही कापूस खरेदी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:15 PM
बोदवडला नोंदणीच्या ३० टक्केही कापूस खरेदी नाही
ठळक मुद्दे साडेतीन हजार शेतकऱ्यांची कापसासाठी नोंदणी