गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : शहरात चोरीचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राची दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख ३५ हजारावर रक्कम लांबविली, तर दुसऱ्या घटनेत मलकापूर रस्त्यावरील धान्य दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या.शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी तोंड वर काढले आहे. गत चार दिवसांपूर्वीच शहरातील दोन किराणा दुकाने तसेच आॅनलाइन सेंटरच्या चोरीच्या घटनेचा तपास लागत नाही तोच सोमवारी पुन्हा चोरट्यांनी हात साफ केला. यात त्यांनी चक्क शहरातील सोनोटी रस्त्यावर भारत पाटील यांच्या घराजवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रातील मोठी दानपेटी फोडली. या दानपेटीत ३५ हजार रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी हात साफ केला. भाविक सकाळी दर्शनासाठी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत बोदवड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.दुसरी घटना मलकापूर रस्त्यावर असलेल्या बाफना ट्रेडर्स या धान्य दुकानात घडली. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून गल्ल्यात असलेली महत्वाची कागदपत्रे चोरट्यांनी पळविली. गल्ल्यात रोख रक्कम नसल्याने सुदैवाने नुकसान टळले.
बोदवडला चोरीचे सत्र थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 6:13 PM
बोदवड शहरात चोरीचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देस्वामी समर्थ केंद्रात दानपेटी फोडली धान्य दुकानाचे कुलूप तोडले