शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

बेवारस म्हणून दफन केलेल्या भादलीच्या तरुणाचा मृतदेह उकरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:17 PM

:रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्दे१२ दिवसानंतर पटली ओळखनातेवाईकांनी केले विधीवत अंत्यसंस्कारअन् नातेवाईकांनी जळगाव गाठले

१२ दिवसानंतर पटली ओळख : नातेवाईकांनी केले विधीवत अंत्यसंस्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१३ :

रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेत मजुरी करणाºया नारायण ठाकूर या तरुणाचा ३० आॅगस्ट रोजी भादली स्टेशनजवळ रेल्वे अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने नशिराबाद पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शासकीय नियमानुसार तीन दिवसात त्याची ओळख न पटल्याने पोलिसांनी नेरी नाका स्मशानभूमीत या तरुणाचा दफनविधी केला. दुसरीकडे मुलगा घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. घरी येण्याची प्रतिक्षा संपल्याने वडील राजाराम दिपचंद ठाकूर, भादली विद्यालयात शिक्षक असलेले चुलत भाऊ एस.पी.ठाकूर व अन्य नातेवाईक सोमवारी नशिराबाद पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना एका तरुणाचा मृतदेह भादली रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याची माहिती मिळाली.अन् नातेवाईकांनी जळगाव गाठलेनारायण ठाकूर या तरुणाचा फोटो दाखविल्यानंतर पोलिसांनीही मयताला ओळखले. मंगळवारी तहसीलदारांची परवानगी घेऊन पोलिसांच्या समक्ष नेरी नाका परिसरात पुरलेला मृतदेह उकरण्यात आला. मृतदेह पाहताच आई, वडील व अन्य नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती अन्य नातेवाईकांनी तातडीने कळविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता विधीवत पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नशिराबाद पोलीसही उपस्थित होते.पत्नी ठाण्याला पोलीस कॉन्स्टेबलनारायण ठाकुर या तरुणाकडे थोडीफार शेती आहे. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. वडील राजाराम पाटील, आई हिराबाई हे दोन्ही शेती काम करायचे तर नारायण यांची पत्नी निशा या ठाणे ग्रामीणला पोलीस कॉन्स्टेबल आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्या जळगावमध्ये पोहचलेल्या नव्हत्या.