शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मोहाडी येथे विहिरीत आढळला वाकडीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 5:30 PM

डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची जखम

कु-हाड, ता. पाचोरा - येथून जवळच असलेल्या साजगाव ते मोहाडी रस्त्यावर असलेल्या विहिरीमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह वाकडी, ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे हे १९ मार्चपासून बेपत्ता होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरजवळील पिंप्री धरणामध्येही शोध घेण्यात आला होता. त्या वेळी मानवी शरीराचे अवशेष आढळून आले होते. मात्र ते कोणाचे होते, ते स्पष्ट झाले नव्हते. या तपास सुरू असताना बुधवारी संध्याकाळी साजगाव ते मोहाडी रस्त्यावर धरणाच्यावरील बाजूस असलेल्या विहिरीमध्ये एक मृतदेह असल्याचे समोर आले. रमेश रामसिंग पाटील हे शेतकरी दहा दिवसांनी, २७ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीतून पाणी काढून ते रोपांना देत असताना त्यांना विहिरीत हात-पाय बांधलेला मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ मोहाडी येथे पोलीस पाटील विजय पवार यांना या बाबत माहिती दिली. पवार यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा पोलीस औट पोस्टला घटना कळविली व पोलीस घटनास्थळी हजर झाले. मात्र रात्र झाल्याने मृतदेह काढणे शक्य नव्हते. त्या मुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेहगुरुवारी सकाळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, पहूर पो.स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ, पिंपळगाव पो.स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासमोर गावकऱ्यांच्या सहकार्याने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. मृतदेह दोघे हात-पाय बांधून व दोन मोठे वजनदार दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताच्या डोक्यावर धारदार शस्राने वारदेखील केलेले होते. मृतदेह पाण्याने फुगून वर आला होता व दुर्गंधी पसरली होती.नातेवाईकांनी ओळख पटविलीवाकडी येथील ग्रा.पं.सदस्य विनोद चांदणे यांचे वर्णनासारखाच मृतदेह असल्याने पोलिसांनी मयताचे भाऊ व नातेवाईकांना गुरुवारी सकाळी घटनास्थळी बोलविले. त्यांनी मयताच्या कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटविली. त्या वेळी सदर मृतदेह विनोद चांदणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव हेदेखील उपस्थित होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. मृतदेह काढला त्या वेळी घटनास्थळी जळगाव येथून मागविण्यात आलेली आरसीपी प्लाटूनची तुकडी बंदोबस्त ठेवून होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव