जळगाव : शिरसोली ते वावदडादरम्यान रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ५५ वर्षीय अनोळची व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. अंमलदार मिलिंद सोनवणे व सदानंद नाईक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
बस स्थानकासमोर कारवाईची मोहीम
जळगाव : विना मास्क वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध शनिवारी दुपारी वाहतूक पोलीस व मनपाच्या वतीने बस स्थानकाच्या बाहेर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर व सहकाऱ्यांनी तासाभरात २० ते २५ जणांवर दंडात्मक कारवाई केली. चारचाकी थांबविल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. तेथून हे पथक दुसरीकडे कारवाईसाठी निघून गेले. गर्दीच्या एकेका ठिकाणी थांबून कारवाया केल्या जात होत्या.