जळगाव : जे वाहन आरटीओच्या रेकॉर्डवरच नाही, त्या चारचाकी वाहनाचे नोंदणीसाठी बोगस नाहरकत प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी शेख सादीक शेख रज्जाक (रा.दंगलग्रस्त कॉलनी, जळगाव) या आरटीओ एजंटला ताब्यात घेतले. बोगस नाहरकत प्रमाणपत्र देणारी एक टोळीच कार्यरत असून या प्रकरणात आणखी काही जण रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जळगाव आरटीओच्या रेकॉर्डवरच नसलेला क्र.एम.एच.१९ सी. पी. ५६७४ विदर्भात एका चारचाकी वाहनाला देण्यात येवून त्याचे जळगाव आरटीओतून बोगस नाहरकत प्रमाणपत्र जारी झालेले आहे.सहा महिन्यापूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकरणात शेगाव, बुलडाणा व नागपूर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. काही महिन्यापूर्वीच याच प्रकरणात शेगाव पोलीस जळगावात आले होते. याच प्रकरणात नागपूर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी व सहकाऱ्यांचे पथक बुधवारी आरटीओ कार्यालयात धडकले.कार्यालयातील सहकाऱ्यांचे लागेबांधेबनावट नाहरकत प्रमाणपत्र वाटप प्रकरणात आरटीओ कार्यालयातील काही जणांचे एजंटशी लागेबांधे असण्याची शक्यता आहे. त्यांच्याशिवाय गोपनीय रेकॉर्ड तयार करणे शक्यच नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याची चौकशी नागपूर पोलीस करीत आहेत. प्राथमिक चौकशीत आणखी काही एजंट व एक लिपिक रडारवर आहेत. एम.एच.१९ सी.पी.५६७४ क्रमांकाचे रेकॉर्डही आरटीओ कार्यालयात तपासण्यात आले.
बोगस नाहरकत पत्र; आरटीओ एजंट ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 1:21 PM