ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26 - भारताची प्रगती व्हावी, जगामध्ये शांतता निर्माण होवून गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही दमदार पाऊस व्हावा अशी प्रार्थना करीत बोहरा समाज बांधवांनी रविवारी सकाळी 6 वाजता ईदची नमाज अदा केली. शहरातील भवानी पेठेतील व शिवाजीनगर भागातील मशिदमध्ये समाज बांधवांनी ईदची नमाज अदा केली.
नमाज अदा केल्यानंतर सर्व समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. बोहरा समाजाचे अध्यक्ष आमील मोहम्मद यांनी 30 दिवस 150 वेळा नमाज अदा केले व इतर धार्मीक विधी केल्याबद्दल व मोहम्मद उज्जैनवाला यांचे आभार बोहरा समाजाचे कोषाध्यक्ष युसूफ मकरा यांनी मानले.
बोहरा समाजाचे धर्मगुरु सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहेब (त.ऊ.स.) यांच्या सूचनेनुसार बोहरा समाजबांधवांच्या घरातील किमान एका व्यक्तीने कुराण तोंड पाठ करण्याचा व दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा :हास पाहता प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मूतरुजा इज्जी, मोहीज आरसीवाला, गुलाम अब्बास लेहरी, तय्यब मास्टर, मुश्ताक सादीकोठ, शब्बीर बदामी, अब्दुलकादर भावनगरवाला, मोईज खामगाववाला, डॉ.मुतरुजा अमरेलीवाला, अब्बास कादीयानी, मुरतुझा बंदूकवाला, अजगर अमरेलीवाला व समाजबांधव उपस्थित होते.